JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Corona : लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार? लॉकडाऊनबाबत मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचं सूचक विधान

Mumbai Corona : लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार? लॉकडाऊनबाबत मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचं सूचक विधान

मुंबईत कोरोनाबाधितांचा (Mumbai Corona Cases) आजचा आकडा थेट 10 हाजारांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागणार की काय? अशा भीतीने सर्वसामान्य धास्तावलेला आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 जानेवारी : पश्चिम बंगाल (West Bengal) आणि दिल्ली (Delhi) पाठोपाठ आता मुंबईतही लोकल ट्रेन (Mumbai Local Train) आणि बुलेट ट्रेनवर निर्बंध लादले जाणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रश्नामागे महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईत वाढणारी रुग्णसंख्या. मुंबईत कोरोनाबाधितांचा (Mumbai Corona Cases) आजचा आकडा थेट 10 हाजारांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागणार की काय? अशा भीतीने सर्वसामान्य धास्तावलेला आहेत. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा केलीय. शहरात दररोज 20 हजारापेक्षा जास्त रुग्णसंख्या वाढायला लागली तर मिनी लॉकडाऊन लावावा लागेल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. याच मुद्द्यावरुन आम्ही मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी (Suresh Kakani) यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी काकणी यांनी मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. तसेच मुंबईत सध्या तरी लॉकाऊन लागू करण्याबाबतचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण रुग्णसंख्या वाढल्यास आमचा नाईलाज राहील, असं सूचक विधान सुरेश काकणी यांनी केलं आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी नेमकं काय म्हणाले? “मुंबईत काल 8 हजार रुग्ण होते. आज 10 हजार होतील, असे दिसत आहे. 55 टक्के नागरिकांना ओमाक्रॅानची लागण होत आहे. याचा प्रसार खूप वेगात होतोय. सुदैवाने मृत्युचं प्रमाण अजूनही कमीच आहे. आजच्या घडीला मुंबई महापालिकेचा कोविड सेंटरमधील 92 टक्के बेड रिकामे आहेत. 15 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत आहे”, अशी माहिती सुशेश काकणी यांनी दिली. हेही वाचा :  प्रतिष्ठित मुस्लिम महिलांचा ‘सौदा’ करणाऱ्या ‘बुल्लीबाई’ अ‍ॅपचा पंचनामा मुंबईत पुन्हा लॉकडाऊन? “लॅाकडॅाऊनचा सध्या तरी विचार नाही. पण रुग्ण वाढले आणि लोकांचे वर्तन ठिक नाही राहीले तर आमची नाईलाज राहील. काल एका सोसायटीत 20 टक्के लोक आढळले. ती सोसायटी आम्ही सील करण्याचा निर्णय घेतला आहे. गरज पडली तर अशा इमारतींबाहेर पोलीस उभे करु. कोरोना रुग्ण अशा वसाहतींमध्ये जास्त आणि दाटीवाटीच्या परिसरांत कमी आहेत”, असं सुरेश काकणी यांनी सांगितलं. लोकल बंद होणार? “लोकल बंद करण्याचा विचार नाही. दर दोन दिवसांनी आढावा घेवून पुढील निर्णय घेतला जाईल. मुंबईतील 87 टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. आणि सध्या ए सीमटेमॅटीक रुग्ण जास्त असल्याचे हे महत्वाचे कारण आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांना लवकरात लवकर डोस पूर्ण करण्याचा विचार आहे. मोहीम जोरात सुरु करुन लवकर पूर्ण करु”, असं काकणी म्हणाले. हेही वाचा :  पुन्हा शिवसेना-भाजप युती होणार?, शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्या विधानाने रंगली चर्चा “या लाटेत ॲाक्सिजन फार लागत नाहीय. बोटावर मोजण्या इतक्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासतेय. ॲाक्सिजनचे उत्पादन आणि उपलब्धता तीन पट्टीने वाढली आहे. आयसीयूचीपण फारशी गरज भासत नाहीय. या लाटेत पॅाझिटिव्ह आलेले रुग्ण 4-5 दिवसांत बरे होत आहेत आणि त्यांना फारसे लक्षणेही दिसत नाही”, असं त्यांनी सांगितलं. “एक-दोन दिवसात टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल आणि आयसीएमआरनी सांगितलंय, बाजारात आलेली गोळ्याची पण खरेदी केली जाणार आहे. लहान मुलांसाठी पीडीयाट्रीक बेड तयार ठेवले आहे. ही सर्व औषधं कोविड पॅाझिटिव्ह झाल्यानंतरच दिली जातात. मास डीस्ट्रीब्युशनचं आम्हाला कुणीही सांगितलं नाहीय. त्यामुळे सध्या विचार नाही”, असं अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकणी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या