शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या व्हिप वॅारमध्ये अखेर एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे.
मुंबई, 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) कुणाचाी असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. त्यातच आता शिंदे गटाला विधिमंडळाने मान्यता दिल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाला मान्यता देण्यात आल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनाही व्हीप बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray ) 16 आमदारांवर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेची सूत्र हाती घेतले आहे. विधानसभा अध्यक्षांची लढाई जिंकल्यानंतर आता बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. बंडखोर आमदार बाहेर पडल्यानंतर त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरुन काढलं होतं. मात्र यावेळीही एकनाथ शिंदे यांनी गटनेते पदाचा दावा केला होता. आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातील वादावर अभ्यास करून दिला मोठा निर्णय दिला आहे. ( Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त ) शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या व्हिप वॅारमध्ये अखेर एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना विधिमंडळ गट नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना मान्यांत दिली आहे. तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे सोमवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं व्हिप बजावला होता. तर तर एकनाथ शिंदे गटानेही व्हिप बजावला होता. त्यामुळे आता शिंदे गटाला मान्यता मिळाल्यामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांवर व्हिप नुसार आमदार पात्रतेची कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशी कारवाई झाली तर शिवसेना आणि शिंदे गटामध्ये मोठा वाद पेटण्याची चिन्ह आहे.