JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Accident : अलिबागला फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीचा भीषण अपघातात मृत्यू, 5 गंभीर

Accident : अलिबागला फिरण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीचा भीषण अपघातात मृत्यू, 5 गंभीर

मांडवा जेट्टीजवळ शनिवारी (दि. 21) सकाळी झालेल्या भीषण अपघातात (accident in Mandva Jetty) एका पर्यटक तरुणीचा मृत्यू झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अलिबाग, 21 मे : मुंबईतून अलिबागला (Mumbai -Alibag road) फिरण्यासाठी आलेले पर्यटक मांडवा (mandwa) येथून मॅक्सीमोमधून प्रवास करत होते. दरम्यान मांडवा जेट्टी उघडीवर शनिवारी (दि. 21) सकाळी झालेल्या भीषण अपघातात (accident) एका पर्यटक तरुणीचा मृत्यू झाला. मॅक्सीमो चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. वर्षा कुटे असे मयत झालेल्या तरुणीचे नाव असून ती 27 वर्षांची होती. दरम्यान मॅक्सीमो कोसळल्याने पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील गंभीर जखमी झालेल्यांना मुंबई येथे हलवत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजू पाटील यांनी दिली.

मुंबईतून अलिबागला फिरण्यासाठी आलेले पर्यटक मांडवा येथून  मॅक्सीमोमधून प्रवास करत होते. सदर मॅक्सीमो मांडव्यापासून काही अंतरावर असलेल्या रहाटले येथील उघडी जवळ आली असताना चालकाचे नियंत्रण सुटून उघडी खाली विरुद्ध बाजूला जावून कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की यात वर्षा बाबासाहेब कुटे रा मुंबई वय 27 या तरुणीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर चालक आणि चार प्रवासी असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत.

हे ही वाचा : Weather Forecast : दक्षिण महाराष्ट्राला पुन्हा झोडपणार Pre-Monsoon, मुंबई-पुण्यात काय अंदाज?

संबंधित बातम्या

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील गंभीर जखमी झालेल्यांना मुंबई येथे हलवत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजु पाटील यांनी दिली.

दिवसभरात या मार्गावरील दुसरी घटना

अलिबाग – मांडवा रस्त्यावर आज दुपारी पीएनपी प्रवासी बस आणि कारचा धोकवडे येथील म्हात्रे फाटा येथे समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील दोघे जखमी झाले आहेत. जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींमध्ये गोरख कडवे व जयेश ठोंबरे यांचा समावेश आहे.

जाहिरात

पीएनपीची प्रवासी बस आज दुपारी मांडवा बंदर येथून अलिबागला  निघाली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धोकवडे येथील म्हात्रे फाटा येथे आली असता समोरून इंडीका कार आली. दरम्यान दोन्ही वाहनांचा समोरासमोर  अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून कारमधील दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोद झाली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या