मुंबईतील गजबलेल्या कुर्ला भागात ही घटना घडली आहे. आज सकाळी अचानक या इमारतीला आग लागली आहे
दिवाकर सिंह, प्रतिनिधी मुंबई, 15 फेब्रुवारी : मुंबई पुन्हा एकदा आगाची घटना घडली आहे. कुर्ला परिसरात एका इमारतीला आग लागली आहे. आगीने भीषण रौद्ररुपधारण केले असून 6 मजले आगीच्या भस्मस्थानी सापडले आहे. या आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहितीसमोर आली आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गजबलेल्या कुर्ला भागात ही घटना घडली आहे. आज सकाळी अचानक या इमारतीला आग लागली आहे.
आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. चौथ्या मजल्यावर आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केलं. इमारतीच्या 10 व्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे. या आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहितीसमोर आली आहे. (घरात काम सुरू असताना महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये स्फोट, 2 कामगार जखमी) आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मालाडमध्ये झोपडपट्टीत अग्नितांडव, 15 सिलेंडर फुटले, एकाचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील मालाड परिसरामध्ये एका झोपडपट्टीमध्ये भीषण अग्नितांडव घडले. एकापाठोपाठ 15 सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीत एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर आगीत 10 ते 15 झोपडीधारक जखमी झाले आहेत. तर 50 पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. (मारहाणीचा अपमान सहन नाही झाला, तरुणाचे उचलले टोकाचे पाऊल) आग लागलेल्या झोपडीतील सिलेंडर फुडल्याने आगीचे रौद्ररूप धारण केले. फुटलेल्या सिलेंडरमुळे मयत १४ वर्षीय तरुणाच्या गळामध्ये पत्र्याचा तुकडा घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. एकूण 15 झोपड्या जळून खाक झाल्यात.