JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईतील वर्सोवामध्ये सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग, एकापाठोपाठ स्फोटाने परिसर हादरला

मुंबईतील वर्सोवामध्ये सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग, एकापाठोपाठ स्फोटाने परिसर हादरला

एकापाठोपाठ सिलेंडरचा भीषण स्फोट होत आहे. या दुर्घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 फेब्रुवारी : मुंबईतील  (Mumbai) वर्सोवा  (versova) भागामध्ये एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आग लागल्यामुळे एकापाठोपाठ सिलेंडरचा स्फोट (Gas cylinder Blast) होत आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहे. मुंबईतील वर्सोवा भागात एलपीजी गॅस सिलेंडरच्या गोदामाला आज सकाळी अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण गोदाम आगीच्या भक्षस्थानी सापडले.

संबंधित बातम्या

एकापाठोपाठ सिलेंडरचा भीषण स्फोट होत आहे. या दुर्घटनेमध्ये चार जण जखमी झाले आहे. जखमींना कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आणखी एका राजकीय कुटुंबात वाद, या मुख्यमंत्र्यांची बहिण काढणार वेगळा पक्ष? आगीची माहिती मिळताच  घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचले  असून आग विझवण्याचं काम सुरू आहे.  आग लागलेल्या गोदामाच्या बाजूलाच एक शाळा आणि हॉस्पिटल आहे. खबरदारी म्हणून परिसर रिकामा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गोदामामध्ये तब्बल 150 सिलेंडरचा स्फोट झाला आहे. आतापर्यंत 4 गळती झालेले सिलेंडर  सापडले असून कुलिंगचे काम सुरू आहे.  गोदामाजवळच  एक तांदूळ विक्रेत्यांच दुकान होतं. या आगीत 16 लाख रुपयांचा तांदूळ जळून खाक झाला आहे. मुंबई पालिकेनं रिकामे झालेले गॅस सिलेंडर जप्त केले आहे. स्थानिकांनी याबाबत आधी सुद्धा तक्रार केली होती परंतु,  कारवाई झाली नसल्याचे समोर आले.  या दुर्घटनेत  काम करणारे 4 कर्मचारी जखमी झाले आहे.  राकेश कडू  (वय 30), लक्ष्मण कुमावत (वय 24), मुकेश कुमावत (वय 30) आणि  मनजीत खान (वय 20) अशी जखमी झालेल्या कामगारांची नाव आहे. जखमींवर कपूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या