JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai:'लिव्ह इन पार्टनर'च्या बाळाचा 5 लाखात केला सौदा, कथित बापासह 11 जणांना अटक

Mumbai:'लिव्ह इन पार्टनर'च्या बाळाचा 5 लाखात केला सौदा, कथित बापासह 11 जणांना अटक

Crime in Mumbai: मुंबईच्या व्ही पी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरचं बाळ तब्बल पाच लाखांना विकलं (4 month old baby girl sell) आहे.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जानेवारी: मुंबईच्या (Mumbai) व्ही पी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरचं बाळ तब्बल पाच लाखांना विकलं (4 month old baby girl sell in 5 lakh) आहे. पीडित चिमुकलीची आई कामानिमित्त बाहेर गेल्यानं आरोपीनं तिच्या बाळावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तथाकथित बापासह एकूण अकरा जणांना ताब्यात (11 accused arrested) घेतलं आहे. तसेच चार दिवस कसून तपास केल्यानंतर, विकण्यात आलेल्या चिमुकलीला तामिळनाडूच्या कोईमतूरमधून ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चार महिन्याच्या चिमुकलीची आई गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी गेली आहे. त्यामुळे तिने आपल्या बाळाला घर मालकीण अन्वरी शेख यांच्या ताब्यात दिलं होतं. तर संबंधित महिलेचा लिव्ह इन पार्टनर आणि मुख्य आरोपी इब्राहिम शेख हा देखील घरीच होता. मागील काही दिवसांपासून घर मालकीण अन्वरी शेख याचं या बाळाची काळजी घेत होत्या. पण आरोपी इब्राहिम याने बाळाला लस द्यायची असल्याचं सांगून अन्वरी यांच्या ताब्यातून बाळाला घेतलं आणि गायब झाला. हेही वाचा- मुलांना कोरोना लसीपासून ‘बचावण्यासाठी’ आईनेच केलं अपहरण, वडिलांच्या तक्रारीनंतर पोहोचली तुरुंगात इब्राहिम बाळाला घेऊन परत न आल्याने 3 जानेवारी रोजी घर मालकीण आणि केअर टेकर अन्वरी शेख यांनी व्ही पी रोड पोलीस ठाण्यात जाऊन इब्राहिम शेख याने बाळाला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली. पोलिसांनी सर्वप्रथम मुख्य आरोपी आणि तथाकथित बाप इब्राहिम याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मालाड, जोगेश्वरी, नागपाडा, सायन, कल्याण, धारावी आणि ठाण्यात छापेमारी करत 2 महिला आणि 4 पुरुषांना ताब्यात घेतलं. हेही वाचा- समाजकार्यासाठी बोलावून विवाहितेला अडकवलं जाळ्यात; 10महिने सुरू होता भयंकर प्रकार संबंधित आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी बाळाला कर्नाटक, तामिळनाडूमध्ये विकल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार, दोन पोलीस पथके कर्नाटक आणि तामिळनाडूला रवाना झाले. पोलिसांनी सलग चार दिवस माग घेत तामिळनाडूतील कोईमतूर येथून बाळाला ताब्यात घेतलं. तसेच येथून एक महिलेसह पाच जणांना ताब्यात घेतलं. या सर्वांची कसून चौकशी केली जात असून आरोपींनी अशाच प्रकारे आणखी बऱ्याच बाळांना विकलं असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. हेही वाचा- 30 हजारात ठरला सौदा, 13 वर्षीय शाळकरी मुलीचा गर्भपात, महिला डॉक्टरला अटक त्याचबरोबर, ‘मीच बाळाचा बाप’ असल्याचा दावा करणाऱ्या आरोपी इब्राहिमची डिएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी चार महिन्याच्या बाळाला एका सामाजिक संस्थेकडे सुपूर्द केलं आहे. या घटनेचा पुढील तपास व्ही पी रोड पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या