JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : मुंबईतील जुहू चौपाटीवर 3 जण बुडाली, दोन भावांचा समावेश

BREAKING : मुंबईतील जुहू चौपाटीवर 3 जण बुडाली, दोन भावांचा समावेश

जुहू चौपाटीवर आज संध्याकाळी ही घटना घडली. चेंबूर येथील राहणारे चार मुलं जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आली होती

जाहिरात

जुहू चौपाटीवर आज संध्याकाळी ही घटना घडली. चेंबूर येथील राहणारे चार मुलं जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आली होती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जून : मुंबईतील जुहू चौपाटीवर (juhu chowpatty mumbai) धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आलेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ आहे. तर एका जणाला वाचवण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमुद्रात वाहून गेलेल्या मुलांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहू चौपाटीवर आज संध्याकाळी ही घटना घडली. चेंबूर येथील राहणारे चार मुलं जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आली होती. चौपाटीवर समुद्रात खेळत असताना अचानक चौघे जण पाण्यात बुडले. पाण्यात बुडालेल्या मुलांचं वय हे 16 ते 21 वर्ष दरम्यान असल्याचे सांगितलं जात आहे. यामध्ये 2 भावांचा समावेश आहे. तर इतर दोन जण हे त्यांचे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेतून एका तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. त्याला तातडीने सांताक्रुझ पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहे. ( गळ्यात तुळशीमाळ, हातात चिपळ्या अन्.. पंतप्रधान मोदीही विठ्ठलभक्तीत न्हाऊन निघाले ) घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.  एका मुलाचा वाचवण्यात आले आहे. तर इतर तीन जणांचा शोध घेतला जात आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने या बेपत्ता मुलांचा समुद्रात शोध घेतला जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार,  दुपारी 4:45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अमन सिंग, (वय 21) कौस्तुभ गणेश गुप्ता, (18 ) आणि  प्रथम गणेश गुप्ता, (16 ) अशी समुद्रात बुडालेल्या तरुणांची नाव आहे. जुहू चौपाटीवर पर्यटनासाठी आलेले ३ लोक पाण्यात बुडाले. या मुलांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न तटरक्षक पथक करत आहे. सुमारे 4 तासांपासून बोटी समुद्रात गस्त घालत सर्च ॲापरेशन करत आहे. एफआरटी पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. नौदलाचे पथक शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या