JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / आठ महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या झैदचे एनसीबीवर गंभीर आरोप, वानखेडेंच्या अडचणी वाढणार?

आठ महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या झैदचे एनसीबीवर गंभीर आरोप, वानखेडेंच्या अडचणी वाढणार?

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणानंतर झैद राणा याने जामीन अर्जात एनसीबी (NCB) आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “वानखेडे यांनी स्वत: माझ्या घरात ड्रग्ज ठेवून मला त्यात अडकवलं आहे”, असा आरोप झैद राणाने केला आहे. याच प्रकरणावर सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे.

जाहिरात

एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ससमुंबई, 18 नोव्हेंबर : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (NCB Zonal Director Sameerr Wankhede) यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत दाखवणारं एक प्रकरण आता चर्चेत आलं आहे. एनसीबीने ड्रग्ज (Drugs) बाळगल्याप्रकरणी झैद राणा (Zaid Rana) नावाच्या 20 वर्षीय तरुणाला एप्रिल महिन्यात अटक केली होती. गेल्या आठ महिन्यांपासून तो कोठडीत (Custody) आहे. पण आता या प्रकरणाला वेगळं वळण लागताना दिसत आहे. एसीबीच्या चार्जशीटमधील घटनाक्रम आणि उपलब्ध सीसीटीव्ही पुरावा यात मोठा तफावत असल्याचा दावा झैदचे वकील अशोक सरावगी यांनी कोर्टात केला आहे. विशेष म्हणजे झैदच्या जामीन अर्जावर येत्या 20 नोव्हेंबरला सेशन कोर्टात निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई एनसीबीने एप्रिल महिन्यात झैद राणा या तरुणावर कारवाई केली होती. हा तरुण ओशिवरा येथे आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. झैदच्या ड्रॉवरमध्ये आणि स्कूटरवर अमली पदार्थ सापडले होते. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून तो कोठडीत आहे. पण आता आर्यन खान प्रकरणानंतर झैद राणा याने जामीन अर्जात एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “वानखेडे यांनी स्वत: माझ्या घरात ड्रग्ज ठेवून मला त्यात अडकवलं आहे”, असा आरोप झैद राणाने केला आहे. याच प्रकरणावर सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. हेही वाचा :  स्वत:च्याच शेततळ्यात बुडून दोघा भावांचा मृत्यू; दुर्देवी घटनेने परिसर हादरला

झैद राणाचे नेमके आरोप काय?

झैद राहत असलेल्या घराशेजारीच वानखेडे कुटुंबाचा फ्लॅट आहे. तो फ्लॅट त्यांनी भाड्याने दिला आहे. झैदचे आई-वडील आणि वानखेडे यांच्या फ्लॅटमध्ये राहणारे भाडेकरु यांच्यात काही कारणावरुन क्षुल्लक वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात ठेवून आपल्याला या प्रकरणात अडकविण्यात आलं, असा आरोप झैदने केला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात चुकीचे दावे करण्यात आल्याचं झैदच्या वकिलांचं म्हणणं आहे. कारवाईच्या वेळी वानखेडे स्वत: तिथे होते. पण त्याविषय नमूद करणं सविस्तरपणे टाळलं आहे. या प्रकरणी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सर्व सत्य समोर येईल, असंदेखील झैदच्या वकिलांनी म्हटलं आहे. हेही वाचा :  राज्यातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जाहीर या प्रकरणात आर्यन खान प्रकरणातीलच पंच साक्षीदार म्हणून दाखवण्यात आले होते. पण पंचांबाबतची अनेक प्रकरणं उघड झाल्यानंतर वानखेडे यांनी खोटा अहवाल तयार करुन पंच साक्षीदार बदलले आहेत, असा देखील दावा झैदचे वकील अशोक सरावगी यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या