मुंबई, 03 मार्च: मुंबईतील कुर्ला याठिकाणी एक धक्कादायक (Mumbai Accident) अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला (2 Youngsters Killed) आहे. एका भरधाव क्रेनने (Crane Accident) एका कोमल यादव (Komal Yadav) या 36 वर्षीय तरुणीला आणि कांचन गुप्ता (Kanchan Gupta) या 35 वर्षीय तरुणाला जोरधार धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कुर्ला याठिकाणी सांताक्रुझ-चेंबुर लिंक रोडवर ही घटना घडली. कोमललाआलेला एक फोन कॉल घेता यावा याकरता ते दोघे लिंकरोडवर थांबले होते. हे दोघेही गोवंडी याठिकाणचे रहिवासी आहे. कोमल आणि कांचन दोघांच्या अशा अपघातामुळे परिसरात दु:खाचं वातावरण आहे. दरम्यान टिळक नगर पोलिसांनी (Tilak Nagar Police) याप्रकरणी सुरेश राजभरला या क्रेन ड्रायव्हरला अटक केली आहे. त्याच्यावर भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे गाडी चालवणे याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटर व्हेइकल कायद्याअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडिया ने याबाबत वृत्त दिले आहे. (हे वाचा- खळबळजनक! भाजपा खासदाराच्या मुलावर बाइकस्वारांनी झाडल्या गोळ्या, आरोपी फरार ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल बाइक चालवत होती आणि कांचन तिच्या मागे बसला होता. दरम्यान दोघेही कुर्ला याठिकाणी त्यांच्या कामासाठी निघाले होते. सीनिअर इन्स्पेक्टर सुनील काळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार कोमलला फोन कॉल आल्यामुळे त्यांनी गाडी थांबवली आणि तेवढ्यात मागून येणाऱ्या भरधाव क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ड्रायव्हरने असं स्पष्टीकरण दिलं आहे की, त्याठिकाणी बाइक अचानकपणे थांबले आणि त्यामुळे तो वेळेवर ब्रेक दाबू शकला नाही.