बँक अकाउंट
मुंबई, 28 मे : तुम्हालाही बँक अकाउंट उघडायचे असेल, पण वेळेअभावी तुम्हाला हे महत्त्वाचे काम करता येत नसेल. तर ते करण्याचा सोपा मार्ग आहे. तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही आणि तुमचे बचत खाते घरी बसून उघडता येईल. एक मोठी बँक तुम्हाला घरी बसून खाते उघडण्याची सुविधा देत आहे, ज्याचा तुम्ही कधीही लाभ घेऊ शकता. देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक तुम्हाला ही सुविधा देतेय. तुम्ही घरी बसून व्हिडिओ कॉलद्वारे पीएनबीमध्ये खाते उघडू शकता. पीएनबीने कालच याबाबत ट्विट करून ही माहिती दिली आहे. पीएनबीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, तुम्ही केवळ व्हिडिओ कॉलद्वारेच बोलू शकत नाही, तर अकाउंटही उघडू शकता. यासोबत PNB ने मदतीसाठी एक लिंक देखील शेअर केली आहे, ज्यावर जाऊन तुम्ही बँक अकाउंट उघडण्याची प्रक्रिया करू शकता.
यासोबतच PNB ने हे देखील सांगितले आहे की, तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे तुमचे बचत खाते कसे उघडू शकता. जाणून घ्या PNB ने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या आहेत. PNB सोबत ऑनलाइन बचत खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी तयार ठेवाव्या लागतील-
फक्त चॅटिंगसाठी नाही, आता लोन घेण्यातही कामी येईल WhatsApp; पाहा कसं1. इंटरनेट अॅक्सेस 2. मोबाईल नंबर आणि तुमचा फोन ज्यावर OTP व्हॅलिडेशनसाठी येईल 3. ईमेल-आयडी 4. आधार नंबर जो तुमच्या मोबाईल नंबरवर अॅक्सेस केला जाऊ शकतो किंवा OTP त्याच्या संबंधित ई-मेलवर येऊ शकतो- (पुढील टप्प्यासाठी व्हॅलिडेशनसाठी) 5. पॅन कार्ड (ओरिजनल) 6. एक पांढरा कागद आणि सही करण्यासाठी काळ्या किंवा निळ्या पेनसह असणे आवश्यक आहे 7. तुमच्या प्रोफेशनल अॅक्टिव्हिटीचा कोणताही पुरावा डॉक्यूमेंट जो अपलोड केला जाऊ शकतो 8. तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये तुमच्या लोकेशनची परवानगी द्यावी लागेल जेणेकरून तुम्ही व्हिडिओ KYC द्वारे ऑनलाइन खाते उघडू शकता
प्रत्येक वेळी मिळेल कन्फर्म तत्काळ तिकीट! ‘या’ ट्रिकने 100 टक्के मिळेल यश-सर्वप्रथम तुम्हाला कोणते अकाउंट उघडायचे त्याच्या प्रोडक्ट्सची निवड करा. -आयडेंटिटी चेकमध्ये तुम्हाला मोबाईल, आधार, पॅन इत्यादी डिटेल्स व्हेरिफिकेशन करावे लागेल. -तिसऱ्या स्टेपमध्ये पर्सनल डिटेल्स टाकून तुम्हाला जी सर्व्हिस निवडायची असेल ती निवडावी. -चौथ्या स्टेपमध्ये व्हिडिओ KYC पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमच्या अकाउंटच्या सर्व फीचर्सचा लाभ घेऊ शकता
-पॅन आणि आधारचे ऑनलाइन आणि तत्काळ व्हॅलिडेशन -OTP आधारित केवायसी सर्व्हिसेस -डेबिट कार्ड, चेकबुक, ई-स्टेटमेंट इत्यादी काढण्यासाठी विविध ऑप्शन. -इंस्टेंट खाते निर्मिती -झटपट व्हिडिओ केवायसी पर्याय