Paytmवरून चुटकीसरशी इतर खात्यात पाठवता येणार पैसे, पाहा कसे पाठवयाचे पैसे?
मुंबई, 24 नोव्हेंबर: नोटबंदीनंतर ऑनलाईन आर्थिक व्यवहारांना चालना देण्यात आली. कोरोना काळात तर ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. आता विविध यूपीआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करणं खूपच सुलभ झालं आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडनं (PPBL) जाहीर केलं आहे की, पेटीएम अॅपच्या मदतीनं युजर्स आता कोणत्याही मोबाइल नंबरवर UPI व्यवहार करू शकतील. पेमेंट प्राप्त करणारा व्यक्ती Paytm वर रजिस्टर्ड नसला तरीही त्याला UPI प्लॅटफॉर्मवर पेमेंट करता येऊ शकतं. यासह पेटीएम अॅपचे युजर्स UPI आयडीवर रजिस्टर्ड कोणत्याही मोबाइल नंबरवरून त्वरित पैसे प्राप्त करू शकतात आणि पाठवू शकतात. Paytm नं सांगितलं की ते युजर्सना सर्व UPI-बेस्ड पेमेंट अॅप्सवर इंटरऑपरेबिलिटीचा लाभ घेण्यास सक्षम करते. त्याच्या मदतीनं एक सुपरफास्ट आणि सुलभ पेमेंट होईल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) सर्व पेमेंट सेवा प्रदात्यांना त्याच्या युनिव्हर्सल डेटाबेसमध्ये प्रवेश करण्यास आणि UPI पेमेंट्स इंटरऑपरेबल बनविण्यास सक्षम बनवलं आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) ही सर्वात मोठी लाभार्थी बँक (Beneficiary) आणि अग्रगण्य प्रेषक बँकेच्या रुपात UPI पेमेंट्सचं नेतृत्व करत आहे. ताज्या NPCI अहवालानुसार, PPBL ने लाभार्थी बँक म्हणून 1,614 आणि पैसे पाठवणारी बँक म्हणून ऑक्टोबर 2022 मध्ये 362 दशलक्षांहून जास्त व्यवहार केले आहेत. हेही वाचा: मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवायचंय? कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, “यूपीआय इकोसिस्टमसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, कारण यामुळे अधिक वापरकर्ते कोणत्याही UPI अॅपवर पैसे पाठवू शकतील.’’ अशा प्रकारे तुम्ही इतर UPI अॅप्ससाठी पैसे देऊ शकता- स्टेप्स 1: पेटीएम अॅपच्या ‘UPI मनी ट्रान्सफर’ विभागात ‘टू UPI अॅप्स’ वर टॅप करा. स्टेप्स 2: ‘मोबाइल नंबर प्रविष्ट करा. ‘कोणत्याही UPI App वर टॅप करा आणि प्राप्तकर्त्याचा मोबाईल नंबर टाका. स्टेप्स 3: रक्कम प्रविष्ट करा आणि त्वरित पेमेंट हस्तांतरित करण्यासाठी ‘Pay Now’ वर टॅप करा.