मुंबई, 15 नोव्हेंबर : नवीन कार खरेदी (News Car) करण्याचा तुम्ही विचार करत असाल आणि सणासुदीच्या काळात (Festive Season) ऑफर मिळण्याची तुमची संधी गमावली असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. फेस्टिव्ह सीझन सेलनंतरही तुम्ही नवीन कारच्या खरेदीवर चांगली सूट मिळवू शकता. स्टेट बँक ऑफ इंडियाची YONO (YONO SBI) नवीन कार खरेदीवर चांगल्या ऑफर देत आहे. या ऑफर्सद्वारे तुम्ही 50 हजार रुपयांपर्यंतचा फायदा घेऊ शकता. हा फायदा केवळ कार खरेदीवरच नाही तर बाईकवरही मिळू शकतो. YONO SBI द्वारे कार खरेदी केल्याने तुम्हाला केवळ पैशांचाच फायदा होणार नाही तर कंपन्यांनी दिलेले फायदेही मिळतील. काही ऑटो कंपन्या कार डिलिव्हरीमध्ये YONO SBI ग्राहकांना प्राधान्य देत आहेत. याचा अर्थ असा की जर तुम्ही YONO SBI द्वारे कार खरेदी केली तर तुम्हाला कारच्या डिलिव्हरीसाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. तुम्हाला गाडीची डिलिव्हरी लगेच मिळेल. सिनेमाच्या तिकीटावर मिळवा 50 टक्के डिस्काउंट; ‘या’ बँकेच्या क्रेडिट कार्डवर ऑफर काय आहे ऑफर? (SBI YONO Offers) तुम्ही SBI YONO अॅपवरून Mahindra XUV किंवा Renault कार खरेदी केल्यास, तुम्हाला कारसोबत येणारे अॅक्सेसरीज अगदी मोफत मिळतील. रेनॉल्ट कार खरेदी केल्यावर, तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंतच्या अॅक्सेसरीज मिळतील. महिंद्रा XUV च्या खरेदीवर 3,000 रुपयांपर्यंतच्या अॅक्सेसरीज उपलब्ध असतील. टोयोटा देखील नवीन कार खरेदी करताना 5,000 रुपयांपर्यंतच्या अॅक्सेसरीज देत आहे. अॅक्सेसरीज व्यतिरिक्त काही कंपन्या कॅश डिस्काउंट देखील देत आहेत. जर तुम्ही Datsun GO कार खरेदी केली तर तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंत रोख सूट मिळू शकते. टाटा मोटर्सच्या कारवर 5,000 रुपयांपर्यंतची रोख सूट दिली जात आहे. वर्षभरात ‘हा’ शेअर 16 टक्के वाढणार, MOTILAL OSWAL चा अंदाज; तुमच्याकडे आहे का? टू व्हीलरवरही अनेक ऑफर्स (Discount Offers on Two Wheelers) कारशिवाय जर तुम्ही YONO अॅपवरून दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही कंपन्या येथे बाईक आणि स्कूटरवर सूट देत आहेत. Hero स्कूटरवर तुम्ही 1500 रुपयांची सूट घेऊ शकता. जर तुम्ही हिरो इलेक्ट्रिकची ई-बाईक खरेदी केली तर तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळेल.