JOIN US
मराठी बातम्या / मनी / YES Bank ग्राहक अद्यापही नाही काढू शकत एटीएममधून पैसे, बँकेने दिलं हे उत्तर

YES Bank ग्राहक अद्यापही नाही काढू शकत एटीएममधून पैसे, बँकेने दिलं हे उत्तर

दरम्यान येस बँकेच्या (Yes Bank) खातेदारांना शनिवारी रात्री काहीसा दिलासा मिळाला होता. एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भात येस बँकेने ट्वीट केलं होतं. मात्र ग्राहकांना अद्यापही पैसे काढताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 मार्च : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) येस (Yes) बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहे. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान येस बँकेच्या (Yes Bank) खातेदारांना शनिवारी रात्री काहीसा दिलासा मिळाला होता. येस बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून असं ट्वीट केलं होतं, ‘तुम्ही तुमचं येस बँकेचं डेबिट कार्ड वापरून येस बँक आणि इतर बँकांच्या एटीएममधून रक्कम काढू शकता. तुम्ही संयम राखल्यामुळे धन्यवाद.’ या ट्वीटमध्ये त्यांनी आरबीआय आणि अर्थ मंत्रालयाला देखील टॅग केलं आहे. त्यामुळे येस बँकेच्या अनेक खातेधारकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज सकाळी जेव्हा अनेकांनी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना एटीएममधून पैसे येत नसल्याच्या अनुभव आला

येस बँकेने शनिवारी उशिरा केलेल्या या ट्वीटवरच अनेकांनी रिप्लाय करत त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. येस बँकच काय इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे येत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. अनेक तक्रारींना उत्तर देण्याचा बँकेकडून प्रयत्न करण्यात आला आहे. बँकेची टेकनिकल टीम यावर काम करत असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. (हे वाचा- पोस्टाची विशेष योजना, 100 रुपयांच्या गुंतवणुकीतून होणार मोठा फायदा ) एका खातेदाराने एटीएममधील फोटो शेअर करत अशी तक्रार केली आहे की, एटीएममध्ये त्याचं कार्ड इनव्हॅलिड दाखवण्यात येत आहे. त्याचं कार्ड डॅमेज किंवा वैध नसल्याचं दाखवण्यात येत आहे.

काय आहे एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा**?** येस बँकेला ट्विटरवरून अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. ज्यामध्ये एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा काय आहे, हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. तर 3 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. बँकेच्या शाखांमध्ये खातेदारांची गर्दी 5 मार्च 2020 ला संध्याकाळी 6 वाजल्यापासून आरबीआयने बँकेतून पैसे काढण्याची मर्य़ादा 50 हजार रुपये केली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांकडून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला गेला. पण ट्रान्सफर किंवा एटीएममधून कॅश काढणं ग्राहकांना शक्य झालं नाही. त्यामुळे शुक्रवारी आणि शनिवारी बँकेच्या विविध शाखांमध्ये ग्राहकांची मोठी रांग दिसून आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या