JOIN US
मराठी बातम्या / मनी / Google च्या नवीन गेमिंग पॉलिसीविरोधात WinZO हायकोर्टात; गेम्स खेळणाऱ्यांचं काय होणार?

Google च्या नवीन गेमिंग पॉलिसीविरोधात WinZO हायकोर्टात; गेम्स खेळणाऱ्यांचं काय होणार?

विन्झो फॅन्टसी स्पोर्ट्स आणि रम्मी कॅटेगरीमध्ये सशुल्क गेम ऑफर करते. अपडेट धोरणाचा निषेध करण्यासाठी 10 सप्टेंबर रोजी Google शी संपर्क साधला असल्याचे विन्झोने सांगितले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 सप्टेंबर : गुगलच्या (Google) नवीन गेमिंग पॉलिसीला (Gaming Policy) आता कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. WinZO या भारतीय ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मने Google चं नवीन गेमिंग धोरण भेदभावपूर्ण असल्याचं सांगत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुगलला नवीन धोरण लागू करण्यापासून रोखण्यात यावं, अशी मागणी विन्झोने केली आहे. विन्झो अ‍ॅप फॅन्टसी स्पोर्ट्स (Fantasy Sports) आणि रमी कॅटेगरीमध्ये सशुल्क गेम ऑफर करतं. हा प्लॅटफॉर्म कॅरम, कोडी आणि कार रेसिंग यांसारख्या श्रेणींमध्ये रिअल-मनी गेम ऑफर करते. Google च्या नवीन गेमिंग धोरणाच्या अंमलबजावणीमुळे, विन्झोला त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळेच त्यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. गुगलने बदलले धोरण बिझनेस स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार, गुगलने अनेक वर्षांपासून भारतात रिअल-मनी गेमला (Real Money Game) परवानगी दिली नव्हती. परंतु, या महिन्यात गुगलने सांगितलं, की फॅन्टसी स्पोर्ट्स आणि रम्मीसाठी असे गेम एक वर्षाच्या पायलट प्रोग्रामचा भाग म्हणून प्ले स्टोअरवर समाविष्ट केले जाऊ शकतात. भारतात मोबाइल गेम्स खूप लोकप्रिय होत आहेत. ड्रीम 11 आणि मोबाइल प्रीमियर लीग (एमपीएल) गेम भारतात फॅन्टसी क्रिकेट खेळण्यासाठी लोकप्रिय आहेत. टायगर ग्लोबल आणि सेक्वोया कॅपिटल या विदेशी गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. गुगलकडून कोणताही प्रतिसाद नाही दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात विन्झोने म्हटलंय की, अपडेट पॉलिसीला विरोध करण्यासाठी त्यांनी 10 सप्टेंबर रोजी गुगलशी संपर्क साधला होता आणि ते ‘अयोग्य’ असल्याचं म्हटलं होतं; मात्र गुगलकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा - Demat Account ओपन केल्यानंतर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात भारतात विन्झोचे 8.5 कोटी युझर्स विन्झोचा दावा आहे, की त्यांचे भारतात सुमारे 8.5 कोटी युझर्स आहेत. युझर्स सरासरी एक तास त्या प्लॅटफॉर्मवर घालवतात. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यानुसार, विन्झोला 2020-21 मध्ये 13 मिलियन डॉलर्सचा वार्षिक महसूल मिळाला होता. वादात सापडलाय ऑनलाइन गेम गेल्या काही काळापासून भारतात ऑनलाइन गेम वादात सापडले आहेत. भारत सरकारच्या पॅनेलने कौशल्य किंवा संधीच्या आधारावर ऑनलाइन गेमचं वर्गीकरण करण्यासाठी रेग्युलेटरी बॉडी स्थापन करण्याची सूचना केली होती. एवढंच नाही, तर प्रतिबंधित गेमिंग फॉरमॅट ब्लॉक करणं आणि जुगाराच्या वेबसाइट्सवर कडक भूमिका घेण्याची सूचनाही करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या