JOIN US
मराठी बातम्या / मनी / कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्ज कोण फेडणार? कर्जानुसार काय आहेत नियम? चेक करा

कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्ज कोण फेडणार? कर्जानुसार काय आहेत नियम? चेक करा

कर्जदाराच्या मृत्यूनंतर प्रत्येक प्रकारच्या कर्जासाठी(Rules of banks for repaying loans) हे नियम वेगळे आहेत. गृहकर्जासाठी हे नियम वेगळे असले तरी वैयक्तिक कर्जासाठी हे नियम काहीसे वेगळे आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जानेवारी : पैशाची गरज असते तेव्हा व्यक्ती बँकेकडून कर्ज (Loan) घेतो. मात्र दुर्दैवी घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँकेला कर्जाची परतफेड कशी होते? तुम्हीही या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल, तर आम्ही तुम्हाला यासंदर्भातील बँकांचे नियम सांगतो. नियम काय आहेत? कर्जदाराच्या मृत्यूनंतर प्रत्येक प्रकारच्या कर्जासाठी(Rules of banks for repaying loans) हे नियम वेगळे आहेत. गृहकर्जासाठी हे नियम वेगळे असले तरी वैयक्तिक कर्जासाठी हे नियम काहीसे वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्जासाठी केलेले नियम समजून घेणे गरजेचे आहे. PPF ते सुकन्या समृद्धी योजनेसह छोट्या बचत योजनांचे व्याजदर जैसे थे; काय आहेत सध्याचे व्याजदर? गृहकर्जासाठी अट (Home Loan) गृहकर्ज घेतले जाते तेव्हा त्याऐवजी घराची कागदपत्रे व्यक्तीकडून गहाण ठेवली जातात. म्हणजे कर्ज सुरु असेपर्यंत घर गहाण असते. व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्जाची परतफेड करण्याचा भार सहकर्जदारावर असतो किंवा ती रक्कम व्यक्तीच्या वारसाद्वारे दिली जाऊ शकते. सहकर्जदाराला ही जबाबदारी तेव्हाच मिळते जेव्हा तो कर्जाची परतफेड करण्याच्या स्थितीत असतो. तसे न झाल्यास बँक घराचा लिलाव करून त्याची रक्कम वसूल करते. पण आजकाल बँकाही नवीन पद्धतीने कर्ज घेतात, जिथे व्यक्तीचा आधीच विमा उतरलेला असतो. त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँका त्यांचे पैसे या विम्यामधून वसूल करतात. त्यामुळे कर्ज घेताना या विम्याची माहिती नक्की घ्या. वैयक्तिक कर्जासाठी नियम (Personal Loan) वैयक्तिक कर्ज सुरक्षित नसल्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी इतर कोणावरही येत नाही किंवा वारसदारही त्याची परतफेड करणार नाहीत. त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूबरोबर कर्जही संपते. मुदतपूर्व कर्ज फेडण्याचे अनेक फायदे; कर्जातून मुक्त होण्यासाठी काय कराल? वाहन कर्ज नियम (Car Loan) वाहन कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे, त्यामुळे ते घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या घरातील कोणीही व्यक्ती त्याची परतफेड करू शकते, अन्यथा बँक कार विकून ते वसूल करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या