ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकजण एक चूक करतात!
मुंबई, 17 सप्टेंबर : इंटरनेटच्या काळात आणि विशेषतः कोरोनामुळे ऑनलाइन शॉपिंग ही आपली सर्वात मोठी गरज बनली आहे. ज्यांना ऑनलाइन शॉपिंग आवडत नव्हतं तेही लोक आता मोबाईलवरुन गोष्टी मागवू लागले आहेत. कारण, कोरोनाच्या युगात घराबाहेर न पडता, आवश्यक असलेले सर्व सामान आपल्या घरी सहज उपलब्ध झालं. पण ऑनलाइन शॉपिंग तुमच्या आरोग्यासाठी जेवढी सुरक्षित आहे, तेवढीच ती तुमच्या बँक खात्यासाठी असुरक्षित होऊ शकते. म्हणूनच ऑनलाइन खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडा तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी, तुमच्यासाठी सीओडी म्हणजेच कॅश ऑन डिलिव्हरी निवडणे अधिक सुरक्षित असेल. या पर्यायामुळे तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स शेअर करण्याची गरज पडत नाही. जेव्हा सामान घरी पोहोचेल तेव्हाच तुम्हाला रोख पेमेंट करावे लागेल. तुमचा एटीएम डिटेल्स सेव्ह करू नका ऑनलाइन खरेदी करताना, पेमेंट करताना तुमच्या एटीएम कार्डचा तपशील कधीही सेव्ह करू नका. अनेकवेळा साईटवर कार्ड डिटेल्स भरताना सेव्ह कार्ड डिटेल्सचा पर्याय येतो आणि त्यावर टिकमार्क असतो. अनेकदा याकडे दुर्लक्ष ओके बटण क्लिक करतात, जे अजिबात सुरक्षित नाही. हा पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि नाही वर क्लिक करा, जे तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. वाचा - तुमच्यासाठी क्रेडिट कार्डची निवड कशी कराल? तज्ज्ञांचं सल्ला समजून घ्या खरेदीसाठी अधिकृत वेबसाइट किंवा अॅप निवडा हॅकर्स बनावट वेबसाइट आणि अॅप्स तयार करून लोकांना आपला बळी बनवतात. म्हणून, कोणत्याही वेबसाइट किंवा अॅपवरून खरेदी करण्यापूर्वी, त्याची वास्तविकता तपासा. तुम्ही खरेदी करणार असलेल्या उत्पादनाची अधिकृत वेबसाइट किंवा अॅप वापरण्याचा प्रयत्न करा. हे शक्य नसल्यास, विश्वसनीय शॉपिंग साइट किंवा अॅपचा अवलंब करा. वेबसाइटच्या URL ची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे ऑनलाइन खरेदी करताना, तुम्ही ज्या वेबसाइटवरून खरेदी करणार आहात त्याची URL तपासणे आवश्यक आहे. वेबसाइटची URL HTTPS ने सुरू झाली पाहिजे आणि HTTP नाही. यामध्ये S चा अर्थ Google ने ही वेबसाईट सिक्योर्ड केली आहे.
सार्वजनिक वाय-फाय कधीही वापरू नका तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी, तुम्ही जेव्हा खरेदी करता तेव्हा तुम्ही सार्वजनिक वाय-फाय नव्हे तर तुमचे स्वतःचे वाय-फाय वापरणे महत्त्वाचे आहे. बर्याच वेळा लोक सायबर कॅफे किंवा रेस्टॉरंट सारख्या सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहून केवळ सार्वजनिक Wi-Fi द्वारे ऑनलाइन खरेदी सुरू करतात, जे अजिबात सुरक्षित नसते. कारण, अशा परिस्थितीत त्यांची बँक आणि त्यांचे तपशील हॅकर्सद्वारे सहजपणे हॅक केले जाऊ शकतात.