JOIN US
मराठी बातम्या / मनी / Car Loan: कार लोन घेताना 'या' गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा कर्ज डोईजड होईल

Car Loan: कार लोन घेताना 'या' गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा कर्ज डोईजड होईल

नेक वेळा कारला लोन घेताना लोक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भविष्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच अशा परिस्थितीत कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 एप्रिल : आपली स्वतःची असावी अंस प्रत्येकाला वाटतं. अनेकाचं हे स्वप्न कार लोनच्या (Car Loan) माध्यमातून पूर्ण होतं. कार लोन (Car Loan) देण्यापूर्वी तुमचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट हिस्ट्री देखील विचारात घेतली जाते. अनेक वेळा कारला लोन घेताना लोक काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भविष्यात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच अशा परिस्थितीत कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. स्वतःचा खर्च जाणून घ्या तुमच्या मासिक उत्पन्नाचं योग्य प्रकारे कॅल्क्युलेशन करणे महत्त्वाचे आहे. तुमचा EMI इतका जास्त नसावा ज्यामुळे तुमच्या घर खर्चाचं आणि लाईफस्टाईलचं संतुलन बिघडेल. इतर सर्व खर्च लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितींचा नेहमी विचार करा. उर्वरित कर्ज किंवा विम्यासाठी पगारातील काही पैसे राखीव ठेवावे. मुलभूत खर्च वगळता जे पैसे शिल्लक राहतील त्यातून इतर गरजा भागवा जेणेकरुन तुमच्या खर्च खिशाला जड होणार नाही. RBI MPC Meeting: कार्ड नसेल तरी नो टेन्शन! ATM मधून तरीही काढता येणार रोख रक्कम; काय आहे आरबीआयचा प्रस्ताव कर्जाचा कालावधी निश्चित करा तुम्ही निश्चितपणे दीर्घ कालावधीसाठी कर्ज मिळवू शकता. पण कमी वेळेत तुम्ही कर्ज फेडाल तितकं चागलं होईल. कार लोन 7 वर्षांपर्यंत मिळते, तुम्ही हवे असल्यास ते कमी करू शकता. अशा परिस्थितीत, तुम्हाला एकाच वेळी म्हणजे डाऊन पेमेंट थोडे अधिक भरावे लागेल, परंतु त्याचे व्याज देखील कमी असेल. यासाठी आधी तुमच्याकडे पुरेशी रक्कम असल्याची खात्री करा. RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा; रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही प्रोसेसिंग फीमध्ये बार्गेनिंग करा प्रोसेसिंग फी भरताना बँकेशी तुम्ही योग्य पद्धतीने बार्गेनिंग केली पाहिजे. जर तुम्ही बँकेशी व्यवस्थित बार्गेनिंग केली तर तुम्हाला भरपूर सूट मिळू शकते. प्रोससिंग फी सुमारे 5000 पर्यंत असू शकते जी तुम्ही कमी करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या