नवी दिल्ली, 30 जानेवारी: आज बहुतांश जणांकडे स्मार्टफोन आहे. Smartphone अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइव क्लासेस यामुळे तर तुमच्या हातातील मोबाइलला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेकदा फोनवरुनच ऑनलाइन आर्थिक व्यवहार केले जातात. मोबाइल वॉलेट्समध्ये बँकिंग डिटेल्स टाकून व्यवहार केले जातात. यामुळे वेळ तर वाचतोच तर काही वेळा डिस्काउंटही मिळतं. मात्र जर तुमचा फोन चोरीस गेला किंवा हरवला तर हे फोनमध्ये सेव्ह असणारे डिटेल्स धोकादायक ठरू शकतात. हे टाळण्यासाठी फोन हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय कराल? SIM कार्ड करा ब्लॉक स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास सर्वात आधी सिम कार्ड ब्लॉक करा, जेणेकरुन चोर आर्थिक सेवांच्या ओटीपी किंवा अन्य मेसेजपर्यंत पोहोचू शकणार नाही. नंतर तुम्ही योग्य प्रक्रिया पूर्ण करून त्याच मोबाइल क्रमांकाद्वारे वापर सुरू ठेवू शकता. इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग अॅक्सेस करा ब्लॉक स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग अॅक्सेस ब्लॉक करा. ऑनलाइन बँकिंग सेवा ब्लॉक करण्याव्यतिरिक्त यूपीआय पेमेंट डिअॅक्टिव्हेट करायला विसरू नका. सर्व पासवर्ड रिसेट करून पुन्हा ऑनलाइन बँकिंग सेवेचा वापर करा. हे वाचा- HDFC Securities ची ‘या’ स्मॉलकॅप फायनान्स स्टॉकवर नजर, चेक करा टार्गेट मोबाइल वॉलेट अॅक्सेस करा ब्लॉक पेटीएम, फोनपे, अॅमेझॉन पे, फ्रीचार्ज सारख्या मोबाइल वॉलेट्सनी आपलं आयुष्य फार सोपं केलं आहे, मात्र या गोष्टी चुकीच्या हातात पडल्या तर तुम्हाला ते महाग पडू शकतं. फोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास मोबाइल नंबरशी लिंक असणारे मोबाइल वॉलेट ब्लॉक करा. पोलिसात करा तक्रार जर तुमचा फोन चोरी झाला असेल किंवा हरवला असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा. यावेळी एफआयआर कॉपी घ्यायला विसरू नका जेणेकरुन फोनचा दुरुपयोग होण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही ही कॉपी पुरावा म्हणून सादर करू शकता.