मुंबई, 25 एप्रिल : नवीन घर घेताना जवळपास प्रत्येकजण मोठ्या उत्साहात गृहकर्ज (Home Loan) घेतो. मात्र या कर्जाची परतफेड करताना आपला जास्तीचा जाणारा पैसा आपली चिंता वाढवतो. त्यामुळे गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड (Home Loan Prepayment) कोणत्याही कर्जदारासाठी फायदेशीर व्यवहार आहे. मात्र व्याजाच्या उत्पन्नामुळे बँकांना तुम्ही तसे करावे असे वाटत नाही. तुमच्या कर्जाची परतफेड करण्याचा सर्वात स्मार्ट मार्ग म्हणजे छोट्या छोट्या प्रीपेमेंटद्वारे तुमचे कर्ज लवकर क्लिअर करणे. जेव्हा तुम्ही एखाद्या वित्तीय संस्थेकडून गृहकर्ज घेता, तेव्हा तुम्हाला ते मासिक हप्त्यांमध्ये फेडावे लागते. बँक तुमच्या खात्यातून हप्त्यांमध्ये ही रक्कम काढत राहते. EMI चे 2 भाग आहेत. पहिले मुद्दल आणि दुसरे व्याज. उदाहरणार्थ, जर तुमचा ईएमआय 10,000 रुपये असेल, तर त्यातील काही भाग तुमचे व्याज भरण्यासाठी जाईल तर दुसरा मूळ रक्कम कमी करण्यासाठी जाईल. हे समीकरण काळानुसार बदलत असते. Share Market Tips: शेअर बाजारात गुंतवणूक करताना ‘ही’ चूक करु नका, नाहीतर कष्टाची कमाई होऊ शकते क्षणात गायब प्रीपेमेंटमध्ये काय होते? जेव्हा तुम्ही प्रीपेमेंट करता तेव्हा ते थेट तुमची मूळ रक्कम कमी करण्यासाठी वापरले जाते. हा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. कारण जर तुमची मुद्दल कमी असेल तर त्यावर व्याजही तितकेच मोजले जाईल. मूळ रक्कम जितकी कमी असेल तितके तुमच्यासाठी चांगले. यामुळे तुम्हाला व्याज कमी होण्यास मदत होईल आणि तुम्ही कर्ज घेतलेल्या वेळेपेक्षा लवकर कर्जाची परतफेड कराल. प्रीपेमेंटमध्ये काय फरक पडतो? समजा, तुम्ही 20 वर्षांसाठी 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. तुमचा व्याजदर 7.4 टक्के निश्चित केला आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याला 16,111 रुपयांचा हप्ता भरता. अशा प्रकारे, 20 वर्षांनंतर, तुमचे 20 वर्षांचे कर्ज 38.7 लाख रुपये होईल. म्हणजेच, तुम्ही 18 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज दिले आहे. दुसरीकडे, जर तुम्ही दरमहा 1,000 रुपये प्रीपेमेंट केले तर 20 वर्षांत ते तुमच्या 29 EMI च्या बरोबरीचे होईल. म्हणजे तुमचे कर्ज सुमारे दोन वर्ष आधी संपेल. Investment Tips: PPF अकाऊंट एक फायदे अनेक; चांगला परतावा, कर्ज, टॅक्स बचत आणि बरंच काही… कर्ज घेण्यापूर्वी प्रीपेमेंटबद्दल जाणून घ्या जर तुम्ही कार, बाईक किंवा घरासाठी कर्ज घेणार असाल, तर तुमच्या कर्ज पुरवठादार संस्था किंवा बँकेकडून प्रीपेमेंटची सखोल माहिती घेणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक प्रीपेमेंटसाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नसल्यास, तुम्ही ऑनलाइन प्रीपेमेंट करू शकता किंवा नाही याची देखील खात्री करा. प्रीपेमेंटसह, तुम्ही तुमचे कर्ज लवकर संपवू शकता आणि आरामदायी जीवन जगू शकता.