क्रेडिट कार्डवरील व्याजामुळे त्रस्त असाल तर ही बातमी महत्त्वाची
मुंबई, 20 फेब्रुवारी: तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डवर जास्त व्याज द्यावे लागते का? तर तुम्हाला क्रेडिट बॅलेन्स ट्रान्सफरबद्दल माहिती असायलाच हवी. या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरील व्याजाचा भार कमी करू शकता. या सुविधेमुळे, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे कर्ज दुसऱ्या क्रेडिट कार्डमध्ये ट्रान्सफर करता. ज्यावर तुम्हाला कमी व्याज द्यावे लागते. क्रेडिट कार्डवर बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे काय आणि तुम्हाला त्याचा फायदा कसा मिळेल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासोबतच आपल्याला हे देखील कळेल की, बॅलन्स ट्रान्सफर करण्याचे काही तोटे आहेत का? जर तोटे असतील तर ते काय आहेत याविषयीही माहिती आपण घेऊ. क्रेडिट कार्ड बॅलेन्स ट्रान्स्फर म्हणजे एका क्रेडिट कार्डवरून उरलेले कर्ज दुसऱ्या क्रेडिट कार्डवर ट्रान्सफर करणे. यामध्ये तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे थकित कर्ज अशा क्रेडिट कार्डवर ट्रान्सफर करता जिथे तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळते. याचा फायदा तुम्ही अशा वेळी घेऊ शकता, जेव्हा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर बिल भरण्यास सक्षम नसाल. म्हणजेच तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डवर इतके व्याज द्यावे लागतेय की, त्याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होत आहे. चक्रवाढ व्याजावर पैसे वाचवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. लक्षात ठेवा की बॅलेन्स ट्रान्सफर केल्याने तुमचे कर्ज कमी होणार नाही. परंतु जर त्याचा योग्य वापर केला तर तुम्ही कमी व्याजासह तुमचे संपूर्ण कर्ज लवकर परत करू शकता.
जर तुम्हाला वाटत असेल की, बॅलेन्स ट्रान्सफरमुळे तुमचे बजेट सुधारू शकते आणि तुमच्यावरील व्याजाचा बोजा कमी होऊ शकतो, तर आम्ही तुम्हाला त्याचे काही फायदे आणि तोटे सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य निर्णय घेऊ शकता.
बॅलेन्स ट्रान्सफरचे फायदे -तुम्हाला एका लिमिटेड कालावधीसाठी झिरो इंटरेस्टची सुविधा मिळते. जर तुम्हाला 0% APR म्हणजेच अॅनुअल परसेंटेज रेट मिळाला तर तुम्ही व्याजावर पैसे वाचवू शकता. -तुमचे कर्ज कंसॉलिडेट केल्याने तुम्हाला कर्जाची परतफेड करणे सोपे होते. म्हणजेच, तुम्ही या कार्डमध्ये तुमची अनेक कर्जे एकत्रित करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एकाच वेळी एकाच ठिकाणी पैसे भरावे लागतील. -एकाच कार्डवर क्रेडिट कंसॉलिडेट केल्याने, तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी होईल. ज्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नाही. तुम्हाला काही बॅलेंस ट्रान्सफर कार्ड्सवर ग्राहक संरक्षण आणि रिवॉर्ड पॉइंट्स सारखे अतिरिक्त फायदे देखील मिळू शकतात.
HDFC चं क्रेडिट कार्ड वापरता? मग तुमच्यासाठी गुडन्यूज, बँकेने सुरु केली खास सुविधाबॅलेंन्स ट्रांसफरचे दुष्परिणाम -तुम्हाला बॅलेन्स ट्रान्सफरसाठी बॅलेन्स ट्रान्सफर फी भरावी लागेल. या सेवेअंतर्गत, तुम्हाला तुमच्या एकूण बॅलेन्स रकमेच्या 3 ते 5% फी भरावी लागते. बॅलेन्स ट्रान्सफर केल्यानंतर, तुम्ही त्याच्या अटी आणि आवश्यकता पूर्ण करण्याचकडे देखील लक्ष दिले पाहिजे. अन्यथा, असे होईल की तुम्ही बॅलेन्स -ट्रांसफर तर करुन घ्याल, परंतु आपण आपल्या खर्चाच्या सवयी बदलल्या नाहीत, ज्यामुळे आपले जुने कर्ज राहिले आहे, परंतु या नवीन कार्डावरील खर्च देखील वाढला आहे. -तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की, बॅलेन्स ट्रांसफरसाठी तुमचा क्रेडिट स्कोर देखील चांगला असावा. यासाठी बँका चांगल्या क्रेडिट स्कोअरला प्राधान्य देतात. -बॅलेन्स ट्रान्सफर केल्यावर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल की, तुम्ही इंट्रोडक्टरी APR ऑफर संपण्यापूर्वीच तुमच्या कर्जाची परतफेड कराल. म्हणजेच, तुम्हाला मिळणाऱ्या कमी व्याजाच्या कालावधीत तुमच्या कर्जाची परतफेड करा, कारण हा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला नियमित APR वर व्याज द्यावे लागेल, ज्यामुळे बॅलेन्स ट्रान्सफरचा विशेष अर्थ राहणार नाही.