मुंबई, 5 मे : आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला शासनानं आधार कार्ड सक्तीचं केलं आहे. आधार कार्डमुळे (Aadhaar Card) नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत मिळते. मतदान करण्यासाठी (Voting), पासपोर्ट (Passport), ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी, नवीन सिमकार्ड (SIM Card) घेण्यासाठी आधार कार्डची मदत होते. तुम्ही तुमच्या आधार कार्डचा ओळखपत्र (ID Card) म्हणून देखील वापर करू शकता. अगदी ट्रेनमध्ये प्रवास करण्यापासून ते मुलांच्या शाळा प्रवेशापर्यंत आणि बँक खाते (Bank Account) उघडण्यापासून ते शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करण्यापर्यंत सर्वत्र आधार कार्ड आवश्यक झालं आहे. अगदी पाच वर्षांखालील मुलांचंही आधार कार्ड काढून घेणं सक्तीचं करण्यात आलं आहे. या मुलांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात यूआयडीनं (UIDAI) ब्लू आधार (Blue Aadhaar) सुरू केलं आहे. पाच वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डवर निळ्या रंगाच्या अक्षरात छपाई केलेली आहे. त्यामुळे त्याला ब्लू आधार म्हणतात. ब्लू आधारला बाल आधार (Baal Aadhaar) असंही म्हणतात. झी बिझनेस नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भारताचा नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती आधारसाठी नोंदणी करू शकते. अगदी नवजात बालकदेखील (Newborn Child) आधार कार्ड मिळवण्यासाठी पात्र ठरते. फक्त त्यासाठी बालकाचं बर्थ सर्टिफिकेट (Birth Certificate) आणि पालकांपैकी एकाचं आधार कार्ड आवश्यक आहे. कारण, लहान मुलांचा आधार क्रमांक पालकांपैकी एकाच्या आधार क्रमांकाशी जोडलेला असतो. पाच वर्षांखलील मुलांच्या आधार कार्डसाठी बायोमेट्रिक्स कॅप्चर केले जात नाहीत. पालकांचा डेमोग्राफिक डेटा (Demographic Data) आणि त्यांच्या यूआयडीशी जोडलेली चेहऱ्याची प्रतिमा वापरून मुलांचा यूआयडी प्रोसेस केला जातो. जेव्हा मूल पाच आणि 15 वर्षांचं होईल तेव्हा त्याला त्याचे बायोमेट्रिक्स (Biometrics) अपडेट करावे लागतील. यामध्ये हाताची दहा बोटं, डोळ्यांची बुबुळं (Iris) आणि चेहऱ्याच्या फोटोचा समावेश होतो. PPF की SSY मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी कोणती योजना फायदेशीर? नीट समजून घ्या ब्लू आधारसाठी कसं अप्लाय करावं? » ब्लू आधार कार्ड मिळवण्यासाठी, uidai.gov.in या ऑफिशियल यूआयडी वेबसाईटवर जा. » तिथे आधार कार्ड रजिस्ट्रेशन (Aadhaar Card registration) या ऑप्शनवर क्लिक करा. » तिथे पालकांना अनिवार्य माहिती भरावी लागेल. उदाहरणार्थ, मुलाचं नाव, पालकाचा फोन नंबर आणि मूल व पालकाची इतर बायोमेट्रिक माहितीची नोंद करावी लागेल. » निवासी पत्ता(Residential Address), परिसर, राज्य आणि इतर डेमोग्राफिक डिटेल्स भरा. » वरील सर्व डिटेल्स सबमिट करा. » आधार कार्ड रजिट्रेशनसाठी अपॉईंटमेंट (Appointment) ऑप्शनवर क्लिक करा. » जवळचं नावनोंदणी केंद्र तपासा आणि अपॉईंटमेंट फिक्स करा. आयडेंटीटी प्रूफ, पत्त्यांचा दाखला, रिलेशनशीप प्रूफ, जन्मतारीख आणि रेफरन्स नंबर यासारखे सर्व गरजेचे डॉक्युमेंट्स सोबत घ्या. » सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचं अॅप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी एक पावती क्रमांक (Acknowledgment Number) मिळेल. रिझर्व्ह बँकेचा क्रेडिट-डेबिट कार्ड ग्राहकांना मोठा दिलासा; बँकांची मनमानी रोखण्यासाठी नवी नियमावली वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाला ब्लू आधार कार्ड मिळेल. पण, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, मूल पाच वर्षांचं झाल्यावर हे ब्लू आधार कार्ड अवैध (Invalid) ठरतं. ते वैध होण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलाचं वय पाच वर्ष पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक्ससह इतर आधार तपशील अपडेट करणं आवश्यक आहे. कोणत्याही शंकाचं निरसण करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी युआयडीच्या uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकता.