JOIN US
मराठी बातम्या / मनी / गृहकर्जाचे व्याजदर वाढल्याने घरखर्चाचं बजेट कोलमडलं? EMI कमी करण्यासाठी काय करु शकता?

गृहकर्जाचे व्याजदर वाढल्याने घरखर्चाचं बजेट कोलमडलं? EMI कमी करण्यासाठी काय करु शकता?

व्याजदर वाढीचा सर्वाधिक फटका गृहकर्ज घेणाऱ्यांना बसणार आहे. कारण गृहकर्ज हे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठे आर्थिक दायित्व असते.

जाहिरात

आरबीआयने काही दिवसांपूर्वीच आपल्या रेपो रेटमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर आता बँकांनी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 जून : स्वस्त गृहकर्जाचे (Home Loan) युग आता संपणार आहे. RBI ने 36 दिवसात दोनदा रेपो दरात (Repo Rate) एकूण 0.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. रेपो दरात आणखी वाढ होणार नाही, असं देखील नाही. आगामी काळात रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. व्याजदर वाढीचा सर्वाधिक फटका गृहकर्ज घेणाऱ्यांना बसणार आहे. कारण गृहकर्ज हे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठे आर्थिक दायित्व असते. अशा स्थितीत गृहकर्जाचा ईएमआय (Home Loan EMI) वाढल्याने लोकांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत, गृहकर्जाचे ओझे कमी करण्याचा मार्ग काय आहे ते जाणून घेऊया? बॅलेन्स ट्रान्सफरचा विचार करा तुम्हाला तुमच्या गृहकर्जाचा व्याजदर तपासण्याची आवश्यकता आहे. यानंतर तुम्ही इतर बँकांच्या व्याजदराबद्दल माहिती घेण्यासाठी संपर्क साधू शकता. इतर बँकांचे व्याजदर कमी असल्यास तुम्ही तिथे तुमचे कर्ज ट्रान्सफर करु शकता. जेणेकरुन तुमचा ईएमआय कमी होईल. मात्र जर तुम्ही सर्वात कमी दराने कर्ज घेतले असेल आणि आताही तुमच्या कर्जदाराचा व्याजदर सर्वात कमी पातळीवर असेल, तर कोणताही फायदा होणार नाही. Bank of Baroda E-Auction: स्वस्त घर खरेदीची संधी, ‘या’ दिवशी लिलावात सहभागी व्हा क्रेडिट स्कोअर सुधारत असताना कमी व्याजदरासाठी चर्चा करा तुम्ही तुमचा EMI वेळेवर भरत असाल तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. गृहकर्ज घेतल्यानंतर तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये (Credit Score), उत्पन्नात किंवा प्रोफाइलमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्यास, तुम्ही गृहकर्ज बॅलेन्स ट्रान्सफरद्वारे कमी व्याजदराने गृहकर्ज मिळवू शकता. कर्जाचा कालावधी वाढवू शकता जर तुमचे गृहकर्ज सर्वात कमी दराने असेल आणि तुम्हाला वाढलेली EMI भरण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही तुमच्या कर्जदात्याला कर्जाची मुदत वाढवण्यास सांगू शकता. साधारणपणे तुमच्या निवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजे 60-65 वर्षापर्यंत गृहकर्जाची मुदत वाढवू शकतात. Multibagger Share: ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांची 1 लाख गुंतवून 70 लाखांची कमाई, तुमच्याकडे आहे का? प्रीपेमेंट करणे सोपे होईल जर बँक कर्जाचा कालावधी वाढवण्यास तयार नसेल, तर तुम्ही प्रीपेमेंट करू शकता. हे तुम्हाला EMI कमी करण्यास मदत करते. बहुतेक गृहकर्ज फ्लोटिंग व्याजदरावर असतात त्यामुळे प्रीपेमेंटवर कोणताही दंड लागत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या