JOIN US
मराठी बातम्या / मनी / रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांतून तुम्ही 'असे' कमवाल पैसे

रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांतून तुम्ही 'असे' कमवाल पैसे

Plastic Water Bottle - रिकाम्या पाण्याच्या बाटल्या फेकू नका. त्यांचं काय करायचं तेच जाणून घ्या

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 सप्टेंबर : सिंगल युज प्लॅस्टिक संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अपिलाचा परिणाम पाहायला मिळतोय. रेल्वेसह अनेक मंत्रालयांनी सिंगल युज प्लॅस्टिकवर निर्बंध लावण्याची घोषणा केलीय. आता पॅकेज वाॅटर बनवणाऱ्या कंपन्याही याचा एक भाग बनणार आहेत. सिंगल युज प्लॅस्टिक संदर्भात 2 ऑक्टोबरपासून अभियान सुरू होतंय. अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी अगोदर प्लॅस्टिकच्या बाटल्यांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना यश आलं नाही. … म्हणून दागिन्यांच्या उद्योगाला मंदीचा फटका, हजारो नोकऱ्या संकटात पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांना काय आहे पर्याय? बाटली बंद पाणी बनवणाऱ्यांकडे कसलाच पर्याय नाही. नॅचरल मिनरल वाॅटर असोसिएशनच्या माहितीनुसार पाण्याची इंडस्ट्री 30 हजार कोटी रुपयांची आहे. बेवरीज इंडस्ट्रीला जोडलं तर पूर्ण इंडस्ट्री 7.5 लाख कोटी रुपये आहे. डिस्ट्रिब्युशन चेन एकत्र केली तर 7 कोटी लोकांवर परिणाम होईल.आता इंडस्ट्री आणि सरकारसमोर पर्यायांचंच आव्हान आहे. सावधान! पैशाच्या देवाण-घेवाणीचे ‘हे’ 7 कडक नियम मोडलेत तर नक्की येईल नोटीस या अभियानात एक पॅकेज वाॅटर बनवणाऱ्या कंपनीचा सहभाग आहे. ही कंपनी बाटली स्वच्छ असेल तर 15 रुपये प्रति किलो आणि खराब असेल तर 10-12 रुपये प्रति किलो हिशेबानं या बाटल्या घेतल्या जातील. मुंबईत 2 वर्षांपूर्वी ही स्कीम सुरू झालीय. दरम्यान, या कंपनीनं  जवळजवळ 5 हजार टन प्लॅस्टिक गोळा केलंय. फोन केल्यावर कंपनीचा प्रतिनिधी तुमच्याकडे येईल आणि वजनाच्या हिशेबानं किंमत देईल. मग बाटल्यांना रिसायकल प्लँटमध्ये पाठवलं जाईल. SPECIAL REPORT : राष्ट्रवादीला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, तब्बल 55 नगरसेवक भाजपात दाखल होणार!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या