JOIN US
मराठी बातम्या / मनी / शाळेची फी भरण्यासाठी हवीये मोठी रक्कम? PPF खात्याची होईल मोठी मदत

शाळेची फी भरण्यासाठी हवीये मोठी रक्कम? PPF खात्याची होईल मोठी मदत

PPF Account: लांसाठी खातं उघडण्यासाठी किमान वयमर्यादा नाही, हे या योजनेचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अगदी 18 वर्षांखालील मुलंदेखील पालकांच्या देखरेखीखाली पीपीएफ खातं उघडू शकतात. या योजनेत तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता.

जाहिरात

शाळेची फी भरण्यासाठी हवीये मोठी रक्कम? PPF खात्याची होईल मोठी मदत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर: पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम (पीपीएफ) ही भारतातील एक अतिशय प्रसिद्ध बचत योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता. इतर बचत योजनांच्या तुलनेत पीपीएफ योजनेत खूप जास्त रिटर्न्स मिळतात. इन्कम टॅक्स सवलत मिळवण्यासाठीदेखील पीपीएफ योजना ही सर्वोत्तम सरकारी योजना मानली जाते. मुलांसाठी खातं उघडण्यासाठी किमान वयमर्यादा नाही, हे या योजनेचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अगदी 18 वर्षांखालील मुलंदेखील पालकांच्या देखरेखीखाली पीपीएफ खातं उघडू शकतात. या योजनेत तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीवर 7.1 टक्के दरानं चक्रवाढ व्याज मिळतं. मात्र, काही पालकांना मुलांचं पीपीएफ खातं बंद करावसं वाटतं. योजनेचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच खातं उघडून 15 वर्षं पूर्ण होण्यापूर्वी पीपीएफ खातं बंद करता येऊ शकतं. पण, यासाठी काही विशेष अटी घालण्यात आल्या आहेत. पीपीएफ योजनेत लहान मुलांचं खातं उघडण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे लहानवयात मुलांच्या नावे पैशांची गुंतवणूक करणं शक्य आहे. मात्र, काही कारणास्तव पालक मुलांचं पीपीएफ खातं बंद करू इच्छित असल्यास त्यांना ते शक्य आहे. खातं उघडल्यानंतर साधारण पाच वर्षांनी मुलांचं खातं बंद करता येतं. मात्र, फक्त मुलांच्या गरजांसाठीच असं करता येऊ शकतं. हेही वाचा:  EPF खात्यातून पैसे काढले तरी TDS कापला जाणार नाही, वापरा ‘हे’ 5 सोपे मार्ग मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, याचा पुरावा देऊन पालकांना खात्यातून अंशत: पैसे काढता येतात. जर, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा उपचारांसाठी पैशांची गरज असेल तर पालक पीपीएफ खात्यातून पैसे काढून ते बंद करू शकतात.

पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत मुलांच्या नावानं पीपीएफ खातं उघडता येतं. या योजनेअंतर्गत तुम्ही दरवर्षी कमीतकमी 500 रुपये आणि जास्तीतजास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. सरकार पीपीएफमध्ये गुंतवणुकीची हमी देतं. म्हणजेच या योजनेत तुमचे पैसे एकदम सुरक्षित आहेत. सध्या सरकार पीपीएफवर 7.1 टक्के वार्षिक व्याज देत आहे. या योजनेमध्ये आयकर कायद्यातील कलम 80 सी नुसार तुमच्या गुंतवणुकीवरील करात सूट मिळते. त्यामुळे फारच गरज असल्याशिवाय मुलांचं पीपीए खातं बंद करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यामुळे तुम्हीही जर मुलांचं पीपीएफ खातं बंद करण्याच्या विचारात असाल तर पुन्हा एकदा विचार करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या