Vodafone-Idea ग्राहकांची चिंता वाढली, पैसे न भरल्यास नोव्हेंबरपासून बंद होऊ शकते सेवा
असीम मनचंदा मुंबई, 29 सप्टेंबर: जर तुम्ही देखील Vodafone-Idea चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या तीन खासगी मोबाइल कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आधीच प्रचंड कर्जाखाली असलेल्या कंपनीला नोव्हेंबरपासून आपली सेवा बंद करावी लागू शकते. कारण इंडस टॉवर्सनंतर आता ATC कंपनी व्होडाफोन आयडियाला नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. व्होडाफोन आयडियाला ATC ची सुमारे 2,000 कोटी रुपये देणी आहेत. ही थकबाकी न दिल्यास नोव्हेंबरपासून सेवा न देण्याचा इशारा या कंपनीनं व्होडाफोन-आयडियाला दिला आहे. व्होडाफोन आयडियाला टॉवर कंपन्यांना एकूण 9,000 कोटींची थकबाकी देणं आहे. व्होडाफोन-आयडियाचे देशभरात सुमारे 25.5 कोटी ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांची चिंता सध्या वाढली आहे. नोव्हेंबर महिना या ग्राहकांसाठी चिंता वाढवणारा ठरू शकतो. देशातील तीन खासगी मोबाइल कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आधीच प्रचंड कर्जाखाली असलेल्या कंपनीला नोव्हेंबरपासून आपली सेवा बंद करावी लागू शकते. कंपनीची विविध 9000 कोटींची देणी आहेत. नुकतीच इंडस टॉवरनं कंपनीला नोटीस पाठवली होती. आता ATC कंपनीनं देखील आपली थकबाकी देण्यासाठी कंपनीला नोटीस पाठवली आहे. हेही वाचा: RBI Tokenization: 1 ऑक्टोबरपासून क्रेडिट-डेबिट कार्ड टोकन बनवणं आवश्यक, वाचा प्रोसेस अन् फायदे व्होडाफोन आयडियाकडे इंडस टॉवर्सचे सुमारे 7,000 कोटी रुपयांचे कर्ज आहे. अनेक दिवसांपासून व्होडा आयडिया ही थकबाकी भरण्यास टाळाटाळ करत आहे. आता इंडस टॉवर्सने अंतिम इशारा दिला असून ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण रक्कम भरण्यास सांगितलं आहे. तसे न झाल्यास नोव्हेंबरपासून टॉवर सेवा बंद करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. या आठवड्यात सोमवारी इंडस टॉवर्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात कंपनीच्या आर्थिक स्थितीवर चर्चा झाली. यानंतर इंडस टॉवर्सने व्होडाफोन आयडियाला 7,000 कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी पत्र लिहिले आहे. इंडस टॉवरशिवाय एटीसीचीही थकबाकी- आता इंडस टॉवर्स पाठोपाठ एटीसीनं देखील कंपनीला नोटीस पाठवली आहे. व्होडाफोन-आयडियानं प्रसिद्ध टॉवर सेवा पुरवठादार अमेरिकन टॉवर कंपनीचेही (ATC) 2,000 कोटी रुपये थकवले आहेत.
कंपनीवर कर्जाचा डोंगर- जिओ आणि एअरटेल नंतर व्होडाफोन आयडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी प्रचंड कर्जात बुडाली आहे. जून अखेर कंपनीवर 1.98 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. यापैकी 1.16 लाख कोटी रुपयांची देय थकबाकी आहे, तर बँका आणि वित्तीय संस्थांकडून 15,200 कोटी रुपयांचे कर्ज घेतलं आहे. कंपनीकडे फिनिश कंपनी नोकियाचं 3,000 कोटी रुपये आणि स्वीडिश कंपनी एरिक्सनचं 1,000 कोटी रुपये आहेत.