राहुल जोशी, नवी दिल्ली, 07 जुलै : प्रसिद्ध बँकर आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ केव्ही कामत (KV Kamath) यांनी कोरोनाचे अर्थसंकट वाटते तेवढे गंभीर नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. न्यू डेव्हलपमेट बँकेचे (New Development Bank) माजी प्रमुख केव्ही कामत यांनी CNBC-TV18 ला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीमध्ये अर्थव्यवस्थेची सुधारणा, कोरोनाचे संकट आणि चीनबरोबरच्या संघर्षातील रणनीती यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा केली. केव्ही कामत यांच्या मते भारतीय अर्थव्यवस्था, आता अंदाज केला जात आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रमाणात सुधारेल. सरकारकडून काही पावलं उचलली जात आहेत. भारतात रोजगाराची परिस्थिती देखील सुधारली आहे. अर्थव्यवस्थेमध्ये होणारी सुधारणा U-shaped recovery असेल आणि त्यामध्ये वेगाने वाढ होत राहील, असे मत कामत यांनी व्यक्त केले आहे. केव्ही कामत NDB चे अध्यक्ष राहिले आहेत. एनडीबीमध्ये त्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. NDBच्या स्थापनेत कामत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, एनडीबीने सिद्ध केले आहे की, दक्षिणेकडील देश एकजूट होऊन प्रगती करू शकतात. (हे वाचा- अलर्ट! 3 वर्षांनी परतला खतरनाक Android व्हायरस, एका मेसेजमध्येच होईल खातं रिकामं ) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून या आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीत 4.5 टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बर्याच रेटिंग एजन्सींनीही अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता वर्तविली आहे. कामथ म्हणाले की, यू-शेप रिकव्हरीमुळे अर्थव्यवस्था वेगाने सुधारण्याची शक्यता आहे. त्यांनी असे मत केले ही, ज्याप्रकारे अर्थव्यवस्थेच्या सुधारणेबाबत भीती व्यक्त केली जात आहे, सुधारणा होताना तेवढ्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागणार नाही. ते पुढे असेही म्हणाले की, अर्थव्यवस्था पुनरूज्जीवित होण्यासाठी काही संकट देखील येतील. मोदी सरकारबाबत काय म्हणाले केव्ही कामत? मोदी सरकारच्या गेल्या 6 वर्षांच्या कालावधीबाबत कामत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला मिळणारे झटके भारताला देखील सहन करावे लागत आहेत. अशावेळी सरकार ज्या वेगाने काम करत आहे, त्यामुळे असा विश्वास मिळतो आहे की 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न सत्यवत आहे. कोरोनानंतर अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा कसा असेल? या प्रश्नाचे उत्तर देताना कामत असे म्हणाले की, भारताच्या विकास दराबाबत विविध संस्थांच्या मताशी ते सहमत नाही आहेत. मात्र कोरोनाच्या परिस्थितीचे आकलन करणे कठीण आहे. भारताची आर्थिक सुधारणा या अंदाजापेक्षा नक्कीच चांगली असेल. (हे वाचा- केवळ 4,852 रुपयात करा सोनेखरेदी! मोदी सरकारच्या या योजनेत मिळेल अतिरिक्त सूट ) सरकार सतत मोठी पावलं उचलत आहे. कृषी क्षेत्रातही अधिक रोजगार मिळत आहे, या क्षेत्रातही वेगाने सुधारणा होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा तसा कमी परिणाम पाहायाला मिळत आहे. त्याचप्रमाणे सरकार डिजिटल अर्थव्यवस्थेबाबत देखील गंभीर आहे. याचा फायदा नक्कीच होत आहे. सरकारने विविध गावांना इंटरनेटमुळे जोडले आहे. संपादन - जान्हवी भाटकर