JOIN US
मराठी बातम्या / मनी / खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव

खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, 'हे' आहेत शुक्रवारचे भाव

Gold, Silver - सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर खूशखबर आहे. जाणून घ्या आजचे दर

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 सप्टेंबर : सोन्याच्या किमतीत खूप मोठी घसरण झालीय. सोनं आज ( 6 सप्टेंबर ) 372 रुपयांनी स्वस्त झालंय. या घसरणीमुळे दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 39,278 रुपये झालीय. रुपयांमध्ये आलेली मजबुती आणि मागणी कमी झाल्यानं सोन्याच्या किमतीत घसरण झालीय. सोन्याप्रमाणे चांदीही कमालीची घसरलीय. चांदीच्या किमतीत 1,273 रुपयांची घट झालीय. आता चांदीची किंमत 49,187 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. PNB होणार देशातली दुसरी मोठी बँक, ग्राहकांना करावे लागतील हे 6 बदल काल सोन आणि चांदी खूप महाग झाली होती. पण आज मागणी कमी झाल्यानं सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड घसरण झालीय. आंतराराष्ट्रीय बाजारात न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,510 डाॅलर प्रति औंस झालंय आणि चांदीचा भाव कमी होऊन 18.30 डाॅलर प्रति औंस आहे. एचडीएफसी सिक्युरिटीचे सीनियर अनॅलिस्ट तपन पटेल म्हणाले, अमेरिका-चीनमधल्या वाढत्या ट्रेड वाॅरमुळे सोन्याची किंमत वाढलीय. अमेरिकानं चीनवर नवा टॅरिफ लावलाय. तो 1 सप्टेंबरपासून लागू झालाय. याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर झालाय. देशाच्या GDPपेक्षा महागडी वस्तू, एक ग्रॅमची किंमत 394 लाख कोटी रुपये भारतात दरवर्षी सुमारे 500 ते 600 टन इतक्या सोन्याची आयात होते. सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले तर खरेदीतही घट होते. पण आता सोन्याबरोबरच चांदीचेही भाव घटल्यामुळे विक्रीमध्ये तेजी येईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात, असाही त्यांचा अंदाज आहे. ‘यामुळे’ PPF, NSC चे व्याज दर होऊ शकतात कमी मात्र असंही बोललं जातंय की, पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे. निप्पॉन लाईफ आणि रिलायन्स कॅपिटलचा वित्तीय सेवा उद्योगात सर्वात मोठा थेट गुंतवणुकीचा करार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या