JOIN US
मराठी बातम्या / मनी / घर खरेदीसाठी चांगली संधी; फेस्टिव्ह सीजनमध्ये 'या' बँकांकडून व्याजदर कपात

घर खरेदीसाठी चांगली संधी; फेस्टिव्ह सीजनमध्ये 'या' बँकांकडून व्याजदर कपात

बँकेने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे होम लोन (Home Loan), तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, पर्सनल लोन घेण्याऱ्या ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : फेस्टिव्ह सीजनमध्ये बँक, होम लोनवर आकर्षक व्याज दर ऑफर करत आहे. सणा-सुदीच्या काळात आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली संधी ठरू शकते. सार्वजनिक क्षेत्रातील तिसऱ्या सर्वात मोठ्या कर्जदाता असलेल्या, बँक ऑफ बडोदाने (BoB) शनिवारी रेपो दरावर आधारित कर्जावरील व्याजदरात (BRLLR) 0.15 टक्क्यांची कपात केल्याचं जाहीर केलं आहे. बँकेचे हे नवे दर 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. बँक ऑफ बडोदाचे जनरल मॅनेजर हर्षद कुमार टी. सोलंकी यांनी सांगितलं की, बँकेने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे होम लोन (Home Loan), तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, पर्सनल लोन घेण्याऱ्या ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे. बँक ऑफ बडोदाने रेपो रेट आधारित कर्जावरील व्याजदर 7 टक्क्यांवरून 6.85 टक्के केले आहेत. या कपातीनंतर आता होम लोनवर 6.85 टक्के, वाहन कर्जावर 7.10 टक्के आणि शैक्षणिक कर्जावर 6.85 टक्के दराने व्याज आकारण्यात येणार असल्याचं बँकेकडून जाहीर करण्यात आलं आहे. (वाचा -  कमी पैशात मोठी कमाई देणारा बिझनेस; महिन्याला कमवा एक लाखांपर्यंत रक्कम ) बँक ऑफ बडोदानंतर, युनियन बँक ऑफ इंडियानेही (Union Bank of India) गृह कर्जाच्या विविध प्रकारांचे व्याज दर कमी केले आहेत. बँकेकडून रविवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. बँकेने 30 लाख रुपयांहून अधिकच्या होम लोन व्याजदरात 0.10 टक्क्यांची कपात केली आहे. महिला कर्जदारांना याप्रकारच्या कर्जावर व्याज दरात 0.05 टक्क्यांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. त्यामुळे महिला कर्जदारांना व्याज एकूण 0.15 टक्के स्वस्त पडेल. 31 डिसेंबर 2020 पर्यंत होम लोनसाठी प्रोसेसिंग चार्ज शून्य केल्याचंही बँकेकडून सांगण्यात आलं आहे. बँकेने, होम लोन टेक ओवर करण्याच्या स्थितीत 10 हजार रुपयांपर्यंतच्या सूटीची घोषणा केली आहे. ही सूट 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू आहे. होम लोनशिवाय, वाहन आणि शैक्षणिक कर्जावरील प्रोसेसिंग चार्जही हटवण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या