JOIN US
मराठी बातम्या / मनी / Loan Guarantor: एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होण्याआधी 'या' गोष्टी समजून घ्या; भविष्यात पश्चातापाची वेळ नाही येणार

Loan Guarantor: एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होण्याआधी 'या' गोष्टी समजून घ्या; भविष्यात पश्चातापाची वेळ नाही येणार

कर्जाचा जामीनदार बँकेला हमी देतो की कर्जदार कर्जाची परतफेड करेल. कर्जदार असे करण्यात अयशस्वी झाल्यास, हमीदार म्हणून मी कर्जाची परतफेड करेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मे : पर्सनल लोन (Personal Loan) हे फार कठीण काम नाही आणि तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट स्कोर (Credit Score) चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळू शकते. परंतु जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल, तुमच्याकडे उत्पन्नाचा कोणताही खात्रीशीर स्त्रोत नसेल किंवा कर्जाच्या परतफेडीचा तुमचा मागील रेकॉर्ड चांगला नसेल, तर अशा परिस्थितीत बँक कर्जासाठी जामीनदाराची (Loan Guarantor) मागणी करते. कर्ज जामीनदार म्हणजे काय? नावाप्रमाणेच, कर्जाचा जामीनदार बँकेला हमी देतो की कर्जदार कर्जाची परतफेड करेल. कर्जदार असे करण्यात अयशस्वी झाल्यास, हमीदार म्हणून मी कर्जाची परतफेड करेल. त्यामुळे त्यातील प्रत्येक पैलू नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे जामीनदार बनत आहात ते पाहा बँका 2 प्रकारचे जामीनदार मागतात. एक म्हणजे गैर-आर्थिक हमीदार आणि दुसरा आर्थिक हमीदार. पहिल्यामध्ये तुमचा वापर फक्त संवादासाठी केला जाईल. तर दुसऱ्या प्रकरणात कर्जदाराने पैसे न भरल्यास तुमच्याकडून वसुली केली जाईल. Akshaya Tritiya 2022: या शुभ मुहूर्तावर Google Pay वरून खरेदी-विक्री करा सोनं; सोपी आहे प्रक्रिया क्रेडिट हिस्ट्री तपासा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही गॅरेंटर बनत आहात त्या व्यक्तीला तुम्ही चांगलं ओळखता का, हे पाहा. तसेच त्याच्या कर्ज परतफेडीच्या हिस्ट्रीवर एक नजर टाका. त्यापूर्वी कर्जाची माहितीही घ्या. तुमची वैयक्तिक मालमत्ता धोक्यात असू शकते वर नमूद केल्याप्रमाणे, कर्जदार कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही पैसे घेतले नसले तरी विचित्र परिस्थितीत तुमची संपत्ती धोक्यात येऊ शकते. Post Office पेन्शन योजना ऑनलाइन, ग्राहकांना घरबसल्या उघडता येणार नवीन खातं तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होऊ शकतो जर कर्जदार लोन डिफॉल्टर झाला तर त्याचा क्रेडिट स्कोअर खराब होईल तसेच तुमच्या स्कोअरवरही परिणाम होईल. यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या