मुंबई : एलन मस्क यांनी कर्मचारी कपात करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 2 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. एलन मस्क यांच्या या निर्णयानंत र ट्विटरची सेवा विस्कळीत झाली आहे. ट्विटर लॉगइन करण्यात अनेक युजर्सना अडचणी येत आहेत. अनेक युजर्सना Something went wrong, but don’t fret — let’s give it another shot असं मेसेज पेजवर येत आहे. ट्विटरच्या सेवेवर परिणाम झाल्याचं दिसत आहे. एलन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना आज ऑफिसला न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे कर्मचारी ऑफिससाठी निघाले आहेत, किंवा जे ऑफिसमध्ये असतील त्यांना घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ट्विटर कर्मचाऱ्यांना एक मेल येईल. हा मेल जर त्यांच्या पर्सनल ई मेलवर आला तर त्यांची नोकरी गेली असं त्यांनी समजावं असंही या मेलमध्ये म्हटलं आहे. कंपनीने त्यासंदर्भात सविस्तर मेलही लिहिला आहे. अनेक युजर्सनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
ट्विटरवर ‘ब्लू टिक’साठी पैसे द्यावे लागल्यास वापरकर्त्यांसाठी Koo ठरेल का नवं ‘घरटं’? काय सांगतात तज्ज्ञ?दुर्दैवाने ट्विटरला यशाच्या मार्गावर नेण्यासाठी हा निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही स्पॅम फोल्डरने तुमचा मेल चेक करा. जर तुमच्या कामावर परिणाम झाला नसेल तर तुम्हाला तुमच्या ट्विटर ई-मेलद्वारे एक सूचना मिळेल. जर तुम्हाला कामावरून काढलं असेल तर ई मेलद्वारे नोटिफिकेशन मिळेल. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ट्विटर-hr@ कोणताही मेल आला नाही, तर मेल peoplequestions@twitter.com वर तुम्ही मेल करा असं ई मेलमध्ये लिहिण्यात आलं आहे.
12 तास आणि आठवड्याचे 7 दिवस काम, ट्वीटर कर्मचाऱ्यांसाठी नव्या बॉसनं कडक केले नियमTwitter चं Blue Tick आता नाही मिळणार फुकट; मोजावी लागणार एवढी मोठी रक्कमतुम्ही जर ऑफिसला निघाला असाल रस्त्यात असाल किंवा ऑफिसमध्ये असाल तर घरी जा. हा काळ सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. तुमची नोकरी टिकली तरी आणि नाही राहिली तरी देखील असं या मेलमध्ये उल्लेख केला आहे. आज ट्विटरचं ऑफिस बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.