JOIN US
मराठी बातम्या / मनी / 12 तास आणि आठवड्याचे 7 दिवस काम, ट्वीटर कर्मचाऱ्यांसाठी नव्या बॉसनं कडक केले नियम

12 तास आणि आठवड्याचे 7 दिवस काम, ट्वीटर कर्मचाऱ्यांसाठी नव्या बॉसनं कडक केले नियम

कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : टेस्लाचा मालक एलन मस्क यांनी नुकतच ट्वीटर आपल्या ताब्यात घेतलं त्यानंतर अनेक मोठे बदल झाले आहेत. ट्वीटरच्या CEO पदावरून पराग अग्रवाल यांना हटवण्यात आलं. यासोबत फ्री असलेलं ब्लू टिक आता चार्ज करण्यात आलं आहे. ब्लू टिकसाठी आता दर महिन्याला 8 डॉलर द्यावे लागणार आहेत. टेस्ला मालकाने नुकतंच ट्विटर विकत घेतलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधील बदलांशी संबंधित काही मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत. मात्र, यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. सीएनबीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ट्विटर अभियंत्यांना दिवसातून 12 तास आणि आठवड्यातून सात दिवस काम करण्यास सांगण्यात आलं आहे. एलन मस्क यांनी ठेवलेलं टार्गेट वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तास काम करावं लागेल असं ट्वीटरच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे.

Twitter चं Blue Tick आता नाही मिळणार फुकट; मोजावी लागणार एवढी मोठी रक्कम

संबंधित बातम्या

ट्वीटरच्या कर्मचाऱ्यांना काही आक्रमक निर्णय पूर्ण करण्यासाठी एलन मस्कने हे काम दिल्याची माहिती मिळत आहे. 12 तासांची शिफ्ट कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देण्याबाबत किंवा त्यांच्या नोकरीच्या सुरक्षेबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही.

एलन मस्क यांचे आदेश पाळले नाहीत आणि त्यांना हव्या असलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत तर कर्मचाऱ्यांची नोकरीही जाऊ शकते अशी मार्केटमध्ये चर्चा सुरू झाली आहे. एलन मस्क 50 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे नोकरी जाऊ नये या धास्तीमुळे कर्मचारी नाईलाजाने काम करत आहेत. तर काही कर्मचारी सोडण्याच्या तयारीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या