JOIN US
मराठी बातम्या / मनी / वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी, टोलमध्ये होणार बदल; किती भरावा लागणार?

वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी, टोलमध्ये होणार बदल; किती भरावा लागणार?

महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: तुम्हाला स्वत:ची गाडी घेऊन प्रवास करायची सवय असेल, तर तुम्ही कधी ना कधी महामार्गावरून प्रवास करताना टोल दिलाच असेल. विशेष म्हणजे तुम्ही टोल असलेल्या एखाद्या महामार्गावरून 1 किलोमीटरचा प्रवास करा किंवा 50 किलोमीटरचा तुम्हाला टोलची रक्कम सारखीच द्यावी लागते. त्यामुळे अनेकदा वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यावरून अनेकदा टोल नाक्यावर वादाचे प्रसंग उभे राहतात. पण आता महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच टोल नाक्यांवरील फिक्स चार्ज सिस्टिममधून दिलासा मिळणार आहे. त्यामुळे टोल असणाऱ्या महामार्गाचा वापर लवकरच स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे टोल असणाऱ्या महामार्गावरून तुम्ही जेवढ्या किलोमीटरचा प्रवास कराल, तेवढ्याच किलोमीटरचा टोल टॅक्स तुम्हाला द्यावा लागणार आहे. खरं तर महामार्गावर थोडं अंतर असो की लांबचं, प्रत्येकाला टोलनाक्यावर समान रक्कम भरावी लागते. म्हणजेच 10 किलोमीटर प्रवास करणाऱ्यांना आणि 50 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्यांना समान रक्कम भरावी लागते. अशावेळी कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या लोकांना स्वतःची फसवणूक झाली आहे, असे वाटत राहते. मात्र, सरकार आता या नियमात बदल करणार आहे. त्यामुळे टोल रस्त्याचा वापर करणं लवकरच स्वस्त होणार आहे. या नव्या निर्णयानुसार तुम्ही टोल असणाऱ्या महामार्गावरून जेवढा प्रवास कराल, तेवढाच टोल टॅक्स तुम्हाला भरावा लागणार आहे. नागरिकांसाठी ही दिलासादायक गोष्ट ठरणार असून यामुळे वाहनचालकांची आर्थिक बचत होणार आहे. टोल प्लाझा काढून बसवले जाणार कॅमेरे ज्या महामार्गासाठी टोल टॅक्स आकारला जातो, अशा महामार्गावरील टोल प्लाझा काढून त्याऐवजी कॅमेरे बसवण्याचा सरकारचा विचार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘सरकार आता टोल प्लाझा काढून कॅमेरे बसवण्याचा विचार करत आहे. यामुळे आता लोकांना टोल प्लाझावर थांबून टोल टॅक्स भरण्याची गरज भासणार नाही. तर, महामार्गावर गाडी चालवताना, संबंधित गाडीशी जोडलेल्या बँक अकाउंटमधून थेट टोल टॅक्सचे पैसे कापले जातील.

याशिवाय, टोल टॅक्स न भरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लवकरच कायद्यात सुधारणा करण्याची तयारी सुरू असल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलं होतं. तसंच नंबरप्लेटशी छेडछाड करणाऱ्या अशा गाडीसाठीही सरकार नवीन नियम आणू शकतं. अशा वाहनांना निर्धारित वेळेत नंबरप्लेट लावण्यास सांगितलं जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या