JOIN US
मराठी बातम्या / मनी / Petrol Diesel Prices : टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे इथे चेक करा

Petrol Diesel Prices : टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे इथे चेक करा

सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : दिवाळीचा उत्साह सगळीकडे आहे. ही साजरी करण्यासाठी सगळेजण आतूर आहेत. कोरोनानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन साजरी होणारी ही दिवाळी एक वेगळा आनंद आणि उत्साह घेऊन येणारी आहे. मात्र या दिवाळीत खिशाला जास्तच कात्री लागू शकते. डॉलरचं मूल्य वाढल्याने क्रूड ऑईल आणि सोन्यावर दबाव आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये गेल्या 24 तासांत फारसा चढउतार झालेला पाहायला मिळाला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा बदल झाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. तर काही शहरांमध्ये किमती कमी झाल्या आहेत. नोएडा-ग्रेटर नोएडा पेट्रोल 28 पैशांनी घसरून 96.64 रुपये तर डिझेल 26 पैशांनी घसरून 89.82 रुपये प्रति लिटर झाले आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 32 पैशांनी महागून 96.58 रुपये आणि डिझेल 32 पैशांनी महागून 89.75 रुपये प्रति लीटर झालं आहे. हे वाचा-Money Mantra : दिवाळी म्हणून दोन्ही हातांनी पैसे खर्च करताय; पण तुमचं आर्थिक भविष्य पाहिलंत का? लखनऊमध्ये पेट्रोलचा भाव 13 पैशांनी कमी होऊन 96.44 रुपये झाला असून डिझेलचा भाव 12 पैशांनी कमी होऊन 89.64 रुपये प्रति लीटर झाला आहे. मुंबईत पेट्रोल 107.24 रुपये, तर डिझेल 94.04 रुपये दराने मिळत आहे. दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केलेला नाही. तेलाचे दर घसरले खरे पण सणासुदीच्या काळात पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण होणार की नाही याबाबत अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या किंमती तुम्ही घरबसल्या पाहू शकता. हे वाचा-Diwali 2022 : 1 रुपयामध्ये मिळतंय सोनं, धनत्रयोदशीला घरबसल्या खरेदी करा! इंडियन ऑइलच्या ग्राहकांना आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड 9224992249 क्रमांकावर लिहून माहिती मिळू शकते आणि बीपीसीएलचे ग्राहक आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड टाइप करून 9223112222 क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात.

एचपीसीएलचे ग्राहक एचपीपीआरसीएलचे ग्राहक एचपीप्रिस आणि त्यांचा सिटी कोड लिहून 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत पाहू शकता. SMS द्वारे तुम्हाला तुमच्या परिसरातील असे दर पाहता येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या