JOIN US
मराठी बातम्या / मनी / दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरणार? काय आहेत आजचे दर पाहा

दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरणार? काय आहेत आजचे दर पाहा

क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये चढउतार होत आहेत मात्र दिवाळीपर्यंत पेट्रोल डिझेलच्या किंमती उतरणार की नाही जाणून घ्या

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : गेल्या २४ तासांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आणखी घसरले आहेत. ब्रेंट क्रूड पुन्हा एकदा 90 डॉलर प्रति बॅरलच्या जवळ येत आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहिले असले तरी एनसीआरसह लखनऊ, पाटणासारख्या शहरांमध्ये तेलाच्या किरकोळ किमती बदलल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार नोएडा-ग्रेटर नोएडा इथे पेट्रोल 5 पैशांनी घसरून 96.59 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 5 पैशांनी घसरून 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे. एनसीआरच्या इतर शहरांमध्ये पेट्रोल 8 पैशांनी वाढून 97.57 रुपये आणि डिझेल 7 पैशांनी वाढून 90.42 रुपये प्रति लीटर झालं. गुरुग्राममध्ये पेट्रोल 41 पैशांनी वाढून 97.18 रुपये आणि डिझेल 40 पैशांनी वाढून 90.05 रुपये प्रति लीटर झालं आहे. लखनऊ में पेट्रोल 96.57 रुपये प्रति लीटर आणि डिजल 89.76 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. पटना इथे पेट्रोल 30 पैशांनी वाढून 107.54 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल देखील 28 पैशांनी वाढलं आहे.

LIC ची नवीन पॉलिसी लाँच, 15 वर्षांनंतर 21 लाखांचा लाइफ कव्हर; वाचा सविस्तर

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टींची भर घातल्यानंतर त्याची किंमत मूळ किमतीपेक्षा जवळपास दुप्पट दर दिसतात. याच कारणामुळे पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

शहरपेट्रोल प्रति लिटर दरडिझेल प्रति लिटर दर
दिल्ली96.7296.72
मुंबई106.3194.27
चेन्नई102.63 94.24
कोलकाता106.0392.76
नोएडा96.59 89.76
लखनऊ 96.5789.76

तेलाचे दर घसरले खरे पण सणासुदीच्या काळात पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण होणार की नाही याबाबत अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या किंमती तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

कस्टम ड्युटी म्हणजे काय? ती ऑनलाइन कशी भरायची?

संबंधित बातम्या

इंडियन ऑइलच्या ग्राहकांना आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड 9224992249 क्रमांकावर लिहून माहिती मिळू शकते आणि बीपीसीएलचे ग्राहक आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड टाइप करून 9223112222 क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. एचपीसीएलचे ग्राहक एचपीपीआरसीएलचे ग्राहक एचपीप्रिस आणि त्यांचा सिटी कोड लिहून 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत पाहू शकता. SMS द्वारे तुम्हाला तुमच्या परिसरातील असे दर पाहता येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या