JOIN US
मराठी बातम्या / मनी / Petrol Diesel च्या दरात पुन्हा बदल, पाहा कुठे स्वस्त तर कुठे महाग झालं पेट्रोल

Petrol Diesel च्या दरात पुन्हा बदल, पाहा कुठे स्वस्त तर कुठे महाग झालं पेट्रोल

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचं मूल्य सतत बदलत आहे. मंदीचं सावट असल्याने कच्च्या तेलाच्या किंमती सारख्या वर खाली होत आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दरही रोज बदलत आहेत. दिवाळीआधी पेट्रोल डिझेल चे दर काही राज्यांमध्ये बदलले आहेत. टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या शहरांमधील दर किती आहेत ते जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड शुक्रवारी 94.40 डॉलर प्रति बॅरलवर, तर डब्ल्यूटीआय 88.87 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. काही राज्यांमध्ये आज पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. आज कोलकात्यात पेट्रोल 77.62 रुपये आणि डिझेल 68.35 रुपये प्रति लिटर दराने ग्राहकांना मिळत आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 21 पैशांनी वाढून 96.89 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 21 पैशांनी वाढून 87.24 रुपये प्रति लिटर झाले आहे. तर हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेल 1 रुपयापर्यंत कमी झालं आहेत.

Financial Planning: ‘या’ वयापासूनच करा गुंतवणूकीला सुरुवात, चाळीशीच्या आतच व्हाल करोडपती
शहरपेट्रोल प्रति लिटर दरडिझेल प्रति लिटर दर
मुंबई106.3194.27
दिल्ली96.72 89.62
कोलकाता 106.03 92.76
चेन्नई102.6394.24
नोएडा96.7689.93

महत्त्वाची बाब म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई महानगरांच्या किंमतीत बराच काळ कोणताही बदल झालेला नाही. रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलतात आणि नवे दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टींची भर घातल्यानंतर त्याची किंमत मूळ किमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. याच कारणामुळे आपल्याला इतके महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावं लागतं.

‘ही’ होती देशातील पहिली बँक! जाणून घ्या कशी आणि केव्हा झाली स्थापना

संबंधित बातम्या

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर मोबाईलद्वारे घरबसल्या पाहू शकता. इंडियन ऑइलच्या ग्राहकांना आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड 9224992249 क्रमांकावर लिहून माहिती मिळू शकते.

बीपीसीएलचे ग्राहक आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड टाइप करून 9223112222 क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात.एचपीसीएलच्या ग्राहकांना एचपीप्राईसचा आणि त्यांच्या शहराचा कोड लिहून तो 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत कळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या