JOIN US
मराठी बातम्या / मनी / कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

गेल्या 24 तासांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : गेल्या 24 तासांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या. सरकारी तेल कंपन्यांनीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेल चे किरकोळ दर जाहीर केले. दिवाळीआधी क्रूड ऑइल घसरल्याने दिलासा मिळणार का याची नागरिक वाट पाहात आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार नोएडा-ग्रेटर नोएडामध्ये पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. तिथल्या लोकांना 96.64 रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागत आहेत. डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर दराने विकण्यात आलं आहे. मुंबईत पेट्रोल 107.24 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लीटर दराने मिळत आहे. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर ब्रेंट क्रूड गेल्या 24 तासांत 0.60 डॉलरने घसरून 91.94 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे.

Money Mantra - उधारीचे आर्थिक व्यवहार टाळा; घाईघाईत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका
शहरांचं नावपेट्रोल प्रति लिटर दरडिझेल प्रति लिटर दर
दिल्ली96.7289.62
मुंबई106.3194.27
कोलकाता106.0392.76
चेन्नई102.6394.24
नोएडा96.6489.82
लखनऊ96.6289.81
पटना107.2494.04
पोर्टब्‍लेयर84.1079.74

डब्ल्यूटीआय 0.71 डॉलरच्या घसरणीसह 85.72 डॉलर प्रति बॅरलने मिळत आहे. आजही दिल्ली, मुंबईसह देशातील चार महानगरांमध्ये तेलाचे दर बदललेले नाहीत. रोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. तेल कंपन्या नवे दर सकाळी जाहीर करतात. त्यानुसार नागरिकांना पेट्रोल डिझेल मिळतं. त्यावर एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन, वॅट असे अनेक टॅक्स लागल्यामुळे नागरिकांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमती खूप जास्त वाढलेली असते.

भारतातील स्थानिक वस्तू ऑनलाइन मिळणे कठीण का आहे?, समोर आलं हे कारण

संबंधित बातम्या

तुम्ही SMS द्वारे पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर तपासू शकता. इंडियन ऑइलच्या ग्राहकांना आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड 9224992249 क्रमांकावर लिहून माहिती मिळू शकते. बीपीसीएलचे ग्राहक आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड टाइप करून 9223112222 क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर एचपीसीएलचे ग्राहक एचपीपीआरसीएलचे ग्राहक एचपीप्रिस आणि त्यांचा सिटी कोड लिहून 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत शोधून काढू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या