मुंबई, 14 सप्टेंबर : पेट्रोल-डिझेलच्या किमती आजही वाढल्यात. आज शनिवारी पेट्रोल आणि डिझेल महाग झालंय. दिल्लीत पेट्रोलची किंमत 8 पैसे आणि डिझेलची 9 पैसे प्रति लीटर झालीय. इंडियन ऑइलच्या वेबसाइटप्रमाणे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर क्रमश: 71.97 रुपये, 77.70 रुपये आणि 74.78 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेल क्रमश: 65.37 रुपये, 68.55 रुपये, 67.78 रुपये आणि 69.08 रुपये प्रति लीटर आहे. सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ, ‘हे’ आहेत शुक्रवारचे दर या आठवड्यात पेट्रोल-डिझेल 4 वेळा महाग झालंय. दिल्लीत पेट्रोल एकूण 21 पैसे प्रति लीटर महाग तर डिझेल 23 पैसे महाग झालंय.याचा परिणाम नेहमीच्या गरजेच्या वस्तू महाग होण्यावर होतो. त्याची झळ सर्वसामान्यांना लागते. रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. PF काढणं एकदम सोपं, तीन दिवसात ‘असे’ मिळतील पैसे आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे. भारताची आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा खूपच कमजोर - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122 या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील. VIDEO: कागल नगरपरिषदेत राडा; भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत तुफान हाणामारी