मुंबई, 25 एप्रिल : शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत जे सातत्याने उत्कृष्ट परतावा देतात. दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना (Dolly Khanna) यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकही (Tina Rubber & Infrastructure Share) गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. या स्टॉकने 2021 मध्ये मल्टीबॅगर परतावा दिला आणि 2022 मध्येही त्याच गतीने चालू आहे. टीना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या जानेवारी-मार्च 2022 या कालावधीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, डॉली खन्ना यांचे चेन्नईस्थित कंपनीमध्ये 1,37,057 शेअर्स किंवा 1.60 टक्के स्टेक आहेत. डॉली खन्ना यांना कमाईचे स्टॉक निवडण्यात तज्ञ मानले जाते. कमी प्रसिद्ध किंवा लोकांच्या नजरेत नसलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ते खुप गुंतवणूक करतात. बँकेचं लोन लवकरात लवकर फेडायला मदत करेल प्रीपेमेंट पद्धत; व्याजही वाचेल आणि टेन्शनही कमी होईल मल्टीबॅगर परतावा 2022 मध्ये, टीना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना 85 टक्के परतावा दिला आहे. 28 एप्रिल 2022 रोजी शेअरची किंमत 34.05 रुपये होती. त्याच वेळी, 25 एप्रिल 2022 रोजी, हा स्टॉक इंट्राडेमध्ये 350 (टीना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चर शेअर किंमत) रुपयांवर पोहोचला. अशाप्रकारे या शेअरने गेल्या वर्षभरात 900 टक्के परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांतही या शेअरने चांगली कामगिरी केली आहे. या शेअरने या कालावधीत 163 टक्के परतावा दिला आहे. जर आपण मागील एका महिन्याबद्दल बोलायटे तर या काळात देखील या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांसाठी भरपूर पैसे कमावून दिले आहेत आणि तो 22.40 रुपये वाढला आहे. सोबतच 2022 मध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 83.21 टक्के परतावा दिला आहे. Investment Tips: PPF अकाऊंट एक फायदे अनेक; चांगला परतावा, कर्ज, टॅक्स बचत आणि बरंच काही… 1 लाख रुपये बनले 10 लाख गेल्या एक वर्षापासून हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर पैसा कमावून देत आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज ती गुंतवणूक 1.23 लाख रुपयांमध्ये झाली आहे. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असतील आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आज त्याचे एक लाख रुपये 2.65 लाख रुपये झाले आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी टीना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले होते, तर आज त्याची गुंतवणूक 10 लाख रुपये झाली आहे.