JOIN US
मराठी बातम्या / मनी / प्रेशर कुकर बनवणारी ही कंपनी FD वर देतेय चक्क 8 टक्के व्याज दर! गुंतवणुकीसाठी तीन पर्याय

प्रेशर कुकर बनवणारी ही कंपनी FD वर देतेय चक्क 8 टक्के व्याज दर! गुंतवणुकीसाठी तीन पर्याय

ही प्रेशर कुकर उत्पादक कंपनी तीन कालावधीसाठी एफडी ऑफर करते. व्याज मिळवण्यासाठी तुम्ही 2 पर्यायांमधून निवड करू शकता.

जाहिरात

प्रेशर कुकर बनवणारी ही कंपनी FD वर देतेय चक्क 8 टक्के व्याज दर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : सहसा लोक फक्त बँक एफडीमध्ये पैसे गुंतवतात. कारण, अनेकांना कंपनी देखील मुदत ठेव योजना राबवतात हे माहिती नसते. तुम्हीही त्यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्या आर्थिक फायद्याची आहे. फिक्स डिपॉजिट योजना राबणावरी हॉकिन्स कुकर लि. ही अशीच एक कंपनी आहे. हा प्रेशर कुकर उत्पादक तीन कालावधीसाठी एफडी ऑफर करतो. कारण, कंपन्या फार काळासाठी एफडी देत ​​नाहीत. मात्र, कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे वचन देतात. हॉकिन्स प्रेशर कुकर 13 महिन्यांच्या एफडीवर 7.5 टक्के, 24 महिन्यांच्या एफडीवर 7.75 टक्के आणि 36 महिन्यांच्या एफडीवर 8 टक्के परतावा देतो. कंपनीने दिलेल्या नवीन FD मध्ये तुम्हाला किमान 25 हजार रुपये गुंतवावे लागतील. याशिवाय, तुम्ही व्याज मिळवण्यासाठी 2 पर्यायांमधून निवडू शकता. एक सहामाही योजना आणि दुसरी एकत्रित योजना. सहामाही योजनेत, तुम्हाला वर्षातून दोनदा व्याज दिले जाईल. तर एकत्रित योजनेत, तुम्हाला FD च्या मुदतीच्या समाप्तीवर एकरकमी व्याज मिळेल. FD व्याजातून तुम्हाला एका वर्षात 5,000 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला तर त्यावर TDS कापला जाईल. वाचा - एखाद्या राज्याचं वार्षिक बजेट नसेल इतके पैसे इलॉन मस्कने एका दिवसात गमावले! एफडीचे रेटिंग आयसीआरएने या मुदत ठेव योजनेला ‘एए’चे स्थिर रेटिंग दिले आहे. हे मानांकन अनेक वर्षांपासून कायम आहे. त्याचवेळी हॉकिन्स कुकरने एफडीचे दर सातत्याने कमी केले आहेत. 2020 मध्ये, कंपनी 3-वर्षांच्या एफडीवर 10 टक्के व्याज देत होती जी 2020 मध्ये 9 टक्के झालं तर 2022 मध्ये 8 टक्क्यांवर आलं. आरबीआयने रेपो दरात केलेल्या वाढीचाही हॉकिन्स कुकरच्या एफडीवर परिणाम झालेला नाही. दुसरीकडे, अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले ​​आहेत. ती वाढ होऊनही हॉकिन्स कुकरचा एफडी दर बँक एफडीपेक्षा खूपच चांगला आहे.

मोठ्या बँकांचे जास्तीत जास्त व्याजदर एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्या एफडी वर सामान्य लोकांना 5.65 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.45 टक्के व्याज देते. त्याचवेळी, दुसरी सरकारी बँक पीएनबी सामान्य लोकांना जास्तीत जास्त 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.45 टक्के व्याज देते. खाजगी बँकांबद्दल बोलायचे झाल्यास, एचडीएफसी सामान्य लोकांना जास्तीत जास्त 6.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.60 टक्के व्याज देते. आयसीआयसीआय बँक सध्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्या एफडीवर जास्तीत जास्त 6.05 टक्के व्याज देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या