स्वीगीची Moonlighting Policy म्हणजे नक्की आहे तरी काय?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून Moonlighting हा विषय चर्चेत आहे. विप्रोने असं करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रातोरात घरी पाठवल्यानंतर तर हा विषय अधिकच चर्चेत आला. आता आणखी एका बड्या कंपनीने Moonlighting प्रकरणी कर्मचाऱ्यांना वॉर्निंग दिली आहे. या प्रकरणातील कर्मचाऱ्यांना मेलवरून इशारा देण्यात आला आहे. हा मेल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मूनलाइटिंगबाबत इशारा देण्यात आला आहे. त्यात आता आयबीएम इंडियानेही कठोर पावलं उचलली आहेत. आयबीएम इंडियाने आपल्या भारतीय युनिटच्या कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. मूनलाइटिंग म्हणजे काय? मूनलाइटिंग म्हणजे एका कंपनीत पे रोलवर कर्मचारी म्हणून काम करत असताना कर्मचारी दुसऱ्या कंपनीतही काम करतो आणि त्यातून पैसे मिळतात. आयबीएम इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये कंपनीचे एमडी संदीप पटेल यांनी मूनलाइटिंग हे कंपनीच्या व्हिजन आणि पॉलिसीजच्या विरोधात असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय कंपनीच्या हितावर परिणाम करणारे कोणतेही वैयक्तिक उपक्रम असतील तर त्याबाबतही कर्मचाऱ्यांना वॉर्न करण्यात आलं आहे.
सरकारी 2 बँका देत आहेत सर्वोत्तम रिटर्न, फक्त ‘या’ योजनेत गुंतवा पैसेमेलमध्ये काय म्हटलं आहे? कर्मचाऱ्याला दुसऱ्या कंपनीत काम करण्याआधी किंवा व्यवसाय करायचा असेल तर त्याला आयबीएम कंपनी सोडावी लागेल. कर्मचारी एखाद्या स्पर्धक कंपनीसाठी लपून काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. कंपनी कला, नृत्य, संगीत अशा कर्मचाऱ्यांच्या छंदाला प्रोत्साहन देईल, मात्र कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कंपनीच्या हिताच्या विरोधात काम करत असेल तर तो कंपनीच्या नियमांचे गंभीर उल्लंघन मानला जाईल, असे संदीप पटेल यांनी मेलमध्ये स्पष्ट म्हटलं आहे. संदीप यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीतील कर्मचारी त्यांच्या कामाच्या वेळेनंतर छोटा व्यवसाय करू शकतात. याआधी मूनलाइटिंगवर त्यांनी विप्रोचे चेअरमन रिशद प्रेमजी यांच्या म्हणण्याला समर्थन असल्याचं सांगितलं होतं.
CNG आणि PNG चे दर कमी होणार? सरकार लवकरच घोषणा करण्याच्या तयारीतकोणत्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिला इशारा? याआधी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि एलटीआय या आयटी क्षेत्रातील कंपन्यांनीही मूनलाइटिंगला विरोध केला आहे. इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे वॉर्निंग दिली होती.