नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो रेट वाढवल्याचा परिणाम बँकांकडून एफडीवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरावरही झाला आहे. एकीकडे बँकांकडून कार, घरासह इतर सर्व प्रकारची कर्जे घेणे महाग झाले आहे, तर दुसरीकडे एफडीवरील व्याजदर वाढले आहेत. त्याचा थेट फायदा गुंतवणूकदारांना मिळत आहे. रेपो दर 5.90 टक्क्यांपर्यंत वाढला असतानाच बँकांचा व्याजदरही 7 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मात्र, सर्व बँकांच्या व्याजदरात तेवढा बदल झालेला नाही. आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे एफडीवरील व्याजदर 7 टक्क्यांहून अधिक झाले आहेत. यामध्ये सरकारी बँकेचा समावेश आहे तर इतर बँका खाजगी क्षेत्रातील आहेत. कॅनरा बँक - सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेने नुकतेच आपले व्याजदर वाढवले होते. बँक आपल्या ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. हे व्याज 666 दिवसांच्या एफडीवर दिले जात आहे. या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7 टक्के दराने व्याज मिळत आहे. बंधन बँक - बँक 18 महिन्यांपेक्षा जास्त ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज देत आहे. याशिवाय बँक 2 वर्षांपेक्षा कमी आणि 3 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 7 आणि 7.50 टक्के व्याज देत आहे. बँक 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर समान व्याजदर ऑफर करत आहे. 22 ऑगस्टपासून नवीन व्याजदर लागू होणार आहेत. आरबीएल - ही बँक 15 महिन्यांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज देत आहे. हाच व्याजदर बँक 15 महिने 1 दिवस ते 725 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर देत आहे. याशिवाय, बँक सामान्य नागरिकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 725 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 7.75 टक्के व्याज देत आहे. बँक 726 दिवसांपासून 24 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7 आणि 7.50 टक्के व्याज देत आहे. आयडीएफसी बँक - ही बँक 750 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे. नवे व्याजदर 10 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. हेही वाचा - रिटायर्डमेंटनंतर कुठून येतील पैसे? LIC चा हा प्लॉन आताच करा चेक लघु वित्त बँका - फिनकेअरमध्ये, 1000 दिवसांच्या एफडीवर 7.5 टक्के आणि उज्जीवनमध्ये 525 आणि 990 दिवसांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज उपलब्ध आहे. याशिवाय सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 999 दिवसांच्या मुदतपूर्तीवर 7.49 टक्के व्याज देत आहे आणि जन स्मॉल फायनान्स बँक 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7.35 टक्के व्याज देत आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 88 दिवसांच्या एफडीवर 7.32 टक्के व्याज देत आहे.