रिकरिंग डिपॉझिट
नवी दिल्ली, 22 मे : तुम्ही रेकरिंग डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आता गुंतवणूक केल्यास जास्त व्याजासह रिटर्न मिळू शकेल. सध्या केवळ फिक्स्ड डिपॉझिटच नाही तर आरडीचे व्याजदरही गेल्या वर्षीपेक्षा वाढले आहेत. RD वर 7% व्याज देणार्या बँकांबद्दल जाणून घेऊया.
प्रायव्हेट सेक्टरची डीसीबी बँक 5 वर्षांच्या रेकरिंग डिपॉझिटवर 7.6% व्याज देत आहे. हा दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आरडीवर उपलब्ध असेल.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 5 ते 10 वर्षांच्या रेकरिंग डिपॉझिटवर 7.25% व्याज देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना बँक रेकरिंग टक्के दराने व्याज देत आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 36 ते 60 महिन्यांच्या रेकरिंग डिपॉझिटवर 7.2 टक्के व्याज देत आहे.
झिरो रिस्क, भरपूर रिटर्न! जबरदस्त परतावा हवाय तर हे लार्ज कॅप फंड्स आहेत बेस्टड्यूश बँक आपल्या ग्राहकांना 5 वर्षांच्या आवर्ती ठेवींवर 7.25 टक्के व्याज देत आहे.
इंडसइंड बँक 61 महिने आणि त्याहून अधिक कालावधीच्या रेकरिंग डिपॉझिटवर 7% व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के एक्स्ट्रा व्याज मिळत आहे.
सेव्हिंग अकाउंटवर मिळतंय 7 टक्यांपेक्षा जास्त व्याज, या बँका देताय शानदार रिटर्न!Axis Bank 5 वर्षांच्या RD वर 7% व्याज देत आहे.
HDFC बँक 5 वर्षांच्या RD वर 7% व्याज देत आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज देत आहे.