JOIN US
मराठी बातम्या / मनी / ALERT: या 8 बँकांच्या ग्राहकांचे चेकबुक 1 एप्रिलपासून होईल निष्क्रिय, त्वरीत करा बँकेशी संपर्क

ALERT: या 8 बँकांच्या ग्राहकांचे चेकबुक 1 एप्रिलपासून होईल निष्क्रिय, त्वरीत करा बँकेशी संपर्क

Bank Alert: बँकेच्या ग्राहकांसाठी (Bank Customers) ही खूपच महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2021 पासून या 8 बँकांच्या ग्राहकांचे जुने चेकबुक (Cheque Book), पासबुक (Pass Book) आणि इंडियन फाइनॅशिंयल सर्व्हिस कोड (IFSC) इनव्हॅलिड होतील.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

aaनवी दिल्ली, 15 मार्च: बँकेच्या ग्राहकांसाठी (Bank Customers) ही खूपच महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2021 पासून या 8 बँकांच्या ग्राहकांचे जुने चेकबुक (Cheque Book), पासबुक (Pass Book) आणि इंडियन फाइनॅशिंयल सर्व्हिस कोड (IFSC) इनव्हॅलिड होतील. म्हणजे 1 एप्रिलपासून या ग्राहकांच्या जुन्या चेकबुकचा काहीच उपयोग होणार नाही. बँकेच्या चेकद्वारे व्यवहार करणं बंद होईल. या 8 बँका अलीकडेच दुसऱ्या मोठ्या बँकांमध्ये विलीन झाल्या आहे. बँकांच्या विलीनीकरणामुळं खातेधारकांचा खातेक्रमांक, आयएफएससी आणि एमआयसीआर कोडमध्ये बदल झाल्यामुळं 1 एप्रिल 2021 पासून बँकिंग सिस्टिम जुन्या चेकला रिजेक्ट करेल. या बँकांचे सर्व चेकबुक अवैध राहतील. त्यामुळं या सर्व बँकांच्या ग्राहकांना सल्ला देण्यात आला आहे की तातडीने आपल्या बँकेच्या शाखेत जा आणि नवीन चेकबुक घ्या. या बँकाचे झाले आहे विलीनीकरण केंद्र सरकारने काही बँकांचे विलीनीकरण केले आहे. बँकांच्या वाढत्या एनपीएच्या (NPA) ओझ्यामुळे केंद्र सरकारनं बँकांचं विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला. विलीनीकरणानंतर बँकांचे चेकबुक, पासबुक, आयएफएससी कोड देखील बदलणार आहेत. त्यामुळे या बँकांच्या ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत 1 एप्रिल 2021च्या आधी नवीन चेक बुक घ्यावे लागणार आहे. (हे वाचा- 18 रुपयांचा शेअर 4 महिन्यांत 1300 रुपये ,10 हजारच्या गुंतवणुकीवर लाखोंचा रिटर्न ) दरम्यान, सिंडिकेट आणि कॅनरा बँकांनी ग्राहकांना थोडासा दिलासा दिला आहे. सिंडिकेट बँकेचं जुनं चेकबुक वापरण्यास 30 जून 2021पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर ग्राहकांना नवीन चेकबुक घ्यावे लागेल. ज्या बँकांचे जुने चेकबुक 1 एप्रिलपासून इनव्हॅलिड होणार आहेत त्यामध्ये देना बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनाइटेड बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे. विलीनीकरण झालेल्या बँकांची यादी -देना बँक (Dena Bank) आणि विजया बँकेचे (Vijaya Bank) विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले आहे. -ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank of Commerce) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) यांचे पंजाब नॅशनल बँकमध्ये (PNB) विलीनीकरण झाले आहे. -सिंडिकेट बँकेचे (Syndicate Bank) कॅनरा बँकेत (Canara Bank) विलीनीरण झाले आहे. -आंध्रा बँक (Andhra Bank) आणि कॉर्पोरेशन बँकेचे (Corporation Bank) युनियन बँक ऑफ इंडियामध्ये (Union Bank of India) विलीनकरण झाले आहे. (हे वाचा- खूशखबर! येत्या आठवड्यांत आणखी घसरणार GOLD PRICE; पाहा किती स्वस्त होणार सोनं ) - अलाहाबाद बँकेचे (Allahabad Bank) इंडियन बँकेत (Indian Bank) विलीनीकरण झाले आहे. हे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आले आहे. चेकबुकची काय गरज आहे बँकेमध्ये सेव्हिंग अकाऊंट (Saving Account) आणि करंट अकाऊंट (Current Account) सुरू करताना बँक आपल्या ग्राहकांना चेकबुक देते. या चेकबुकच्या मदतीने ग्राहक पैशांचा व्यवहार करु शकतात. चेकबुक आणि त्याच्या पानावर बरीच माहिती असते. त्यावर आयएफएससी, मॅग्नेटिक इंक करेक्टर रेकग्निशन (MICR) कोड असतो. आज बरीच कामं या कोडच्या मदतीनेच होतात. आपल्याकडे असलेल्या जुन्या चेकबुकवर जुन्या बँकेचा आयएफएससी आणि एमआयसीआर कोड असतो. हे कोड आता बदलले आहेत. त्यामुळे तुम्हाला जुन्या चेकबुकवर व्यवहार करता येणार नाही. तुम्ही जर आताच नव्या चेकबुकसाठी अर्ज केला तर तुम्हाला 10 दिवसांमध्ये नवीन चेकबुक मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या