JOIN US
मराठी बातम्या / मनी / TCS चा कर्मचारी झाला Zomato डिलीव्हरी बॉय, शेअर केला Food Delivery वेळी येणाऱ्या अडचणींचा अनुभव

TCS चा कर्मचारी झाला Zomato डिलीव्हरी बॉय, शेअर केला Food Delivery वेळी येणाऱ्या अडचणींचा अनुभव

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (TCS) सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केलेल्या एका तरुणाने तिथली नोकरी सोडून फूड डिलिव्हरी सुरू केली. यानंतर त्याने आपला अनुभव लिंक्डइन या वेबसाइटवर शेअर केला. यात त्याने त्याला आलेल्या अडचणी सविस्तर लिहिल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 एप्रिल : झोमॅटो डिलिव्हरी एजंट्सना (Zomato Delivery Agent) ऑर्डर वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असते. यासाठी त्यांना कित्येक वेळा बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. एवढं करूनही त्यांची कमाई म्हणावी तेवढी नसते. या फूड डिलिव्हरी (Food Delivery Agent) करणाऱ्या एजंट्सपुढच्या अडचणी ग्राहकांना माहितीच नसतात. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (TCS) सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केलेल्या एका तरुणाने तिथली नोकरी सोडून फूड डिलिव्हरी (TCS Employee Turns Zomato Delivery Agent) सुरू केली. यानंतर त्याने आपला अनुभव लिंक्डइन या वेबसाइटवर शेअर केला. यात त्याने त्याला आलेल्या अडचणी सविस्तर लिहिल्या आहेत. श्रीनिवासन जयरामन (Srinivasan Jayaraman) हा तरुण टीसीएसमध्ये काम करत होता. तिथला जॉब सोडल्यानंतर तो चेन्नईला आपल्या घरी गेला. नवीन ठिकाणी जॉइन होण्यापूर्वी काही तरी करायचं म्हणून त्याने झोमॅटोचं (Zomato Delivery Boy) काम पार्ट-टाइम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांतच त्याला फूड डिलिव्हरी करणाऱ्यांचं आयुष्य कसं असतं हे समजलं. त्याने आपला अनुभव आणि या कामातून शिकलेले सहा महत्त्वाचे मुद्दे आपल्या लिंक्डइन (Srinivasan Jayaraman LinkedIn Post) अकाउंटवरून शेअर केले. जयरामन सांगतो, की कित्येक वेळा ग्राहक आपला पत्ता नीट देत नाहीत. तसंच कित्येकांनी आपला फोन नंबर अपडेट केलेला नसतो, त्यामुळे लोकेशनच्या जवळ वेळेत पोहोचूनही ग्राहकांपर्यंत डिलिव्हरी देण्यास उशीर होतो. तसंच कित्येक वेळा तर रेस्टॉरंट शोधणंही अवघड जातं. ज्या ठिकाणी हॉटेल आहे, ते ठिकाण आपल्यासाठी नवीन असेल, तर अगदी गुगल मॅप्सच्या मदतीनेही शोधणं अवघड होतं, असं जयरामनने सांगितलं.

हे वाचा -  Zomato बॉयचा अपघाती मृत्यू; कुटुंबाच्या मदतीसाठी धावले Twitter यूजर्स, जमा केले लाखो रुपये

तो पुढे लिहितो, “काही वेळा हॉटेल आणि डिलिव्हरी लोकेशनमधलं अंतर खूपच जास्त असतं. मला स्वतःला एका रेस्टॉरंटपासून तब्बल 14 किलोमीटर दूर असणारी ऑर्डर मिळाली होती. कित्येकांना वाटतं, की काही भागांतून भरपूर ऑर्डर मिळत असतील; मात्र तसं काही नसतं. अशा ‘हॉटस्पॉट’ म्हणवल्या जाणाऱ्या भागांमधून मला अगदीच कमी ऑर्डर मिळाल्या.”

हे वाचा -  ‘मुलांच्या जीवाशी खेळ..’; Zomato च्या 10 मि फूड डिलिव्हरी सेवेवर का संतापले रोहित पवार?

मिळणाऱ्या ऑर्डर्सची संख्या हा देखील महत्त्वाचा मुद्दा असल्याचं जयरामन आपल्या पोस्टमध्ये म्हणतो. तीन तासांमध्ये आपल्याला केवळ तीनच ऑर्डर मिळाल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यातही तिसरी ऑर्डर 14 किलोमीटर दूरची होती. अशामध्ये पेट्रोलची दरवाढ हे आणखी एक मोठं आव्हान असल्याचं तो म्हणतो. आपल्या पोस्टच्या शेवटी त्याने झोमॅटोला टॅग (Zomato) करून डिलिव्हरी एजंट्सना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. “मी काही ठिकाणी वाचलं, की तुम्ही पेट्रोलच्या वाढत्या किमतींच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना मदत करणार आहात. हे नक्कीच कौतुकास्पद आहे,” असंही तो म्हणाला. त्याची ही लिंक्डइन पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या