मुंबई, 4 सप्टेंबर : देशभरामध्ये ट्रस्टच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांना दिली जाणारी करसवलत कमी होण्याची शक्यता आहे. ट्रस्टच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या काही संस्था करसवलतीचा दुरुपयोग करत आहेत,असं डायरेक्ट टॅक्स कोड समितीचं म्हणणं आहे. त्यामुळेच ही सवलत रद्द कमी करावी, अशी शिफारस समितीने केली आहे. करसवलतीच्या नावाखाली काळा पैसा जमा करणाऱ्या ट्रस्टच्या गैरकारभाराला आळा घालावा, असंही समितीने म्हटलं आहे. याच समितीने इनकम टॅक्समध्येही काही बदल सुचवले आहेत. पर्सनल इनकम टॅक्सच्या दरांमध्ये समितीने 5, 10 आणि 20 टक्क्यांच्या स्लॅबची शिफारस केली आहे. सध्या 5, 20 और 30 टक्क्यांचे स्लॅब आहेत. युतीच्या जागांचा फॉर्म्युला काय? या नेत्याच्या घरी झाली पहिली बैठक धार्मिक आणि शिक्षणसंस्थांना दिलेल्या देणगीतून 15 टक्के सूट मिळते. उरलेली 85 टक्के रक्कम 5 वर्षांच्या आत खर्च केली तरी करात सवलत मिळते.आता हा 15 टक्क्यांचा नियम हटवण्याची शिफारस समितीने केली आहे. इनकम टॅक्स सवलतीसाठी उत्पन्नाची मर्यादा 6 लाख रुपये करावी, असंही समितीचं म्हणणं आहे.त्यामुळे सामान्य माणसांना दिलासा मिळू शकतो. =============================================================================================== VIDEO: मुंबईकरांनो सावधान, येत्या 48 तासांत होणार मुसळधार पाऊस