JOIN US
मराठी बातम्या / मनी / Sukanya Samruddhi Yojana: फक्त कपडे अन् फटाके नको, लक्ष्मीपूजनाला आपल्या मुलीला द्या सुरक्षित आर्थिक भविष्याची भेट

Sukanya Samruddhi Yojana: फक्त कपडे अन् फटाके नको, लक्ष्मीपूजनाला आपल्या मुलीला द्या सुरक्षित आर्थिक भविष्याची भेट

Sukanya Samruddhi Yojana: जर तुमच्या मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत खातं उघडू शकता. या योजनेअंतर्गत लोक आपल्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैसे जमा करू शकतात.

जाहिरात

Sukanya Samruddhi Yojana: यंदाच्या लक्ष्मीपूजनाला मुलींना द्या सुरक्षित आर्थिक भविष्याची भेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑक्टोबर:  दिवाळी म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा सण. दिवाळी हा सण अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. या सणादिवशी आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना भेटवस्तू देतो. आपल्या घरातील लहान मुलांना छान छान कपडे तसेच गिफ्ट घेतो. पण यंदाच्या दिवाळीला तुम्हाला तुमच्या मुलीला दिवाळीच्या निमित्तानं भेटवस्तू द्यायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा एक चांगला पर्याय आहे. ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही योजना केंद्र सरकारची मुलींसाठी असलेली अल्प बचत योजना आहे. जी बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजना ही लघु बचत योजनेतील सर्वोत्तम व्याजदर योजना आहे. सरकारची सुकन्या समृद्धी योजना तुम्हाला उत्तम परतावा मिळवण्याची संधी तर देतेच पण तुमच्या मुलीचं उच्च शिक्षण, करिअर आणि लग्नाची खात्रीही देते. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी खातं उघडता येतं. 250 रुपये जमा करून उघडता येतं खातं- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 10 वर्षे वयाच्या आधी 250 रुपयांच्या ठेवीसह खातं उघडलं जाऊ शकतं. चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. सध्या त्यावर 7.6 टक्के व्याज मिळत आहे.  हेही वाचा:  Diwali 2022 Bank Holidays : अरे देवा! पुढचे 6 दिवस बँका राहणार बंद, आजच करून घ्या काम पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खातं उघडा- तुम्ही कोणत्याही अधिकृत बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडू शकता. या योजनेत कोणतीही व्यक्ती आपल्या दोन मुलींसाठी खातं उघडू शकते. वयाच्या 21व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. या योजनेत 9 वर्षे 4 महिन्यांत रक्कम दुप्पट होईल.

416 रुपये दैनंदिन बचतीचे बनवा 65 लाख रुपये- जर तुम्ही 2022 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल आणि तुमच्या मुलीचं वय 1 वर्ष असेल. जर तुम्ही दररोज 416 रुपयांची बचत केली, तर तुम्हाला महिन्यात 12,500 रुपये गुंतवता येतील. तुम्ही दरमहा 12,500 रुपये जमा केल्यास तुम्हाला एका वर्षात 1.5 लाख रुपये गुंतवता येतील. सन 2043 मध्ये मुलगी 21 वर्षांची झाल्यावर योजना परिपक्व होईल, त्या वेळी एकूण परिपक्वता रक्कम 6,500,000 रुपये असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या