मुंबई : कोणंतच काम छोटं किंवा मोठं नसतं. हे आज रमेश बाबू यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. घरची परिस्थिती नसल्यानं अगदी पेपर टाकण्यापासून कामाची सुरुवात केली. त्यानंतर हेअर कटिंग केलं. आज त्यांना बंगळुरूतील करोडपती न्हावी म्हणून ओळखलं जातं. रमेश बाबू हे बंगळुरूमधील करोडपती न्हावी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सलून चालवतात. सलूनमध्ये येणाऱ्याकडून केस कापण्याचे ते फक्त दीडशे रुपये घेतात. आजच्या घडीला त्यांच्याकडे लग्झरी कारही आहेत. अगदी रोल्स रॉयर्स नाही तर वेगवेगळ्या महागड्या गाड्याही आहेत. त्यांच्याकडे ३७८ गाड्यांचं कलेक्शन आहे. त्यामध्ये १२० या लग्झरी कार आहेत. सलून व्यवसायाव्यतिरिक्त त्यांनी आता कार व्यवसायही चालू केला आहे. त्यांची गाड्यांची आवड त्यांनी व्यवसायात बदलली आणि मोठं यश मिळालं. मर्सिडिज, ऑडी, जाग्वार, तुम्ही ज्या ब्रँण्डचं नाव घ्याल ती गाडी माझ्याकडे आहे असं रमेश बाबू म्हणतात. ही कमाई त्यांना वडिलोपार्जित नाही, तर कमवलेल्या पै पै रुपयांमधून मिळवली आहे. रमेश बाबू फक्त सलून व्यवसायत समाधानी नव्हते. त्यांना आणखी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यांना खूप पुढे जायचं होतं पण करायचं काय यावर चर्चा सुरू झाली. त्यासाठी त्यांनी १९९३ मध्ये त्यांनी पहिली मारूती कार खरेदी केली. ही गाडी त्यावेळी एवढे पैसे नसल्याने लोनवर घेतली. हेही वाचा- अकरावीत 35 टक्के गुण, शेती कसली, सहा वर्ष अपयश पचवलं, PSI संग्राम मालकर यांची संघर्षगाथा पहिले तीन महिने लोन भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यांची आई ज्या घरात घरकाम करत होती तिथे असलेल्या नंदिनी नावाच्या महिलेनं त्यांना गाडी भाड्याने देण्याचा सल्ला दिला. या एका सल्ल्यानं त्यांचं आयुष्य आणखी बदललं. या एका युक्तीवरून कार रेंटल बिझनेसची आयडिया डोक्यात आली आणि आम्ही तो करायचा ठरवलं. मला काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करायचं होतं. २०११ मध्ये विचार केला की आपल्याकडे रोल्स रॉयल्स असायला हवी. ही गाडी देखील ते भाड्याने देतात. दिवसाला याचं भाडं जवळपास ५० हजार रुपये आहे.
हेही वाचा-लहानपणी शिक्षिका होऊ इच्छिणारी मुलगी कशी बनली FinTuber; संपूर्ण प्रवास एका क्लिकवर रमेश बाबू एवढं सगळं करत असले तरी त्यांना असं वाटतं की हेअर कटिंग हा माझा खरा व्यवसाय आहे. त्यातून सुरुवात झाली. त्यांना हा व्यवसाय सोडायचा नाही. आजही ते सलूनमध्ये जाऊन स्वत: ग्राहकांचे हेअरकट करतात.