JOIN US
मराठी बातम्या / मनी / Credit Card Bills : आर्थिक तंगीमुळे क्रेडिट कार्डचं बॅलेन्स भरणं कठीण जातंय? या 4 टिप्स येतील कामी

Credit Card Bills : आर्थिक तंगीमुळे क्रेडिट कार्डचं बॅलेन्स भरणं कठीण जातंय? या 4 टिप्स येतील कामी

Credit Card Bills : क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर न भरल्यामुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकला असाल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला अशा चार ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही सहज कर्जाच्या जाळ्यातून बाहेर येऊ शकता.

जाहिरात

क्रेडिट कार्ड बिल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जून : गेल्या काही वर्षांत क्रेडिट कार्ड चा ट्रेंड झपाट्याने वाढलाय. ज्यावेळी आपल्याकडे जास्त बँक बॅलन्स नसतं. तेव्हा आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरून आपलं काम पूर्ण करत असतो. हे एक प्रकारचे कर्ज आहे, जे तुम्हाला नंतर परतही करावं लागतं. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला ग्रेस पीरियड देखील दिला जातो. त्या ग्रेस पीरियडमध्ये कर्जाची परतफेड केल्यास कोणतेही व्याज द्यावं लागत नाही. परंतु तुम्ही ग्रेस पीरियड कालावधीत कर्जाची परतफेड करू शकत नसाल तर तुम्हाला भरपूर व्याज द्यावे लागेल. क्रेडिट कार्डचं बॅलेन्स वेळेवर न भरल्यामुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकला असाल तर टेन्शन घेऊ नका. आज आपण अशा चार ट्रिक्स पाहणार आहोत ज्याच्या मदतीने तुमचं टेन्शन दूर होऊ शकतं.

बिल emi मध्ये कन्व्हर्ट करा

तुम्ही डिफॉल्टर झाला असाल आणि क्रेडिट कार्ड बिल भरण्यास असमर्थ असाल, तर याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होईल. क्रेडिट कार्डचे बिल ईएमआयमध्ये रूपांतरित करणं कधीही चांगलं. EMI चा फायदा असा असेल की तुम्हाला क्रेडिट कार्ड बिलाची संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरण्याची गरज नाही आणि तुमचा आर्थिक भार कमी होईल.

Home Loan: होम लोनचा ईएमआय भरणं कठीण जातंय? तुमच्याकडे आहेत ‘हे’ पर्याय

बॅलेन्स दुसऱ्या क्रेडिट कार्डवर ट्रान्सफर करा

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर तुम्ही क्रेडिट कार्डचं बॅलेन्स दुसऱ्या कार्डमध्ये ट्रान्सफर करू शकता. याचा फायदा असा होईल की तुम्हाला वेगळा क्रेडिट पीरियड मिळेल. अशा वेळी व्याज न वाढवता, तुम्हाला पेमेंट करण्यासाठी एक्सट्रा वेळ मिळेल.

टॉपअप लोन

जर तुम्ही आधीच होम लोन घेतले असेल, तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी टॉप-अप लोन देखील घेऊ शकता. टॉप अप लोन हे असे कर्ज आहे, ज्यामध्ये तुमच्या आधीच चालू असलेल्या कर्जावर बँकेकडून अतिरिक्त रक्कम दिली जाते. ही एक प्रकारे अॅड ऑन सुविधा आहे जी बँक आपल्या ग्राहकांना देते.

Health Insurance : हेल्थ इन्शुरन्सविषयी कन्फ्यूस्ड आहात? सोप्या शब्दात समजून घ्या ही माहिती

संबंधित बातम्या

FD, PPF वर लोन

तुम्ही FD, PPF किंवा अशा कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असेल ज्यावर कर्जाची सुविधा उपलब्ध असेल, तर तुम्ही क्रेडिट कार्डवर पैसे भरण्यासाठी या सुविधेचा लाभ घेऊ शकता. अशाप्रकारे, तुम्हाला कमी व्याजावर कर्ज मिळेल आणि तुम्ही क्रेडिट कार्डची थकबाकी सहजपणे भरु शकाल. यामुळे तुमचे बजेटही बिघडणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या