मुंबई, 10 मे : जागतिक बाजार (Global Market) आणि देशांतर्गत घटकांच्या दबावाखाली मंगळवारी शेअर बाजारात (Share Market) विक्री सुरू राहू शकते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार पुन्हा प्रॉफिट बुकींगकडे जात असून त्यात घसरण झाली तर सेन्सेक्स (Sensex) 54 हजारांच्या खाली जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 365 अंकांच्या घसरणीसह 54,471 वर बंद झाला, तर निफ्टी 109 अंकांनी घसरून 16,302 वर पोहोचला. अमेरिकन शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम युरोपीय आणि आशियाई बाजारांवरही दिसून येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय शेअर बाजारातील अनिश्चिततेचा निर्देशांक सध्या खूप वाढला आहे आणि गुंतवणूकदारही त्यांचे पैसे काढून घेत आहेत, ज्यामुळे सलग सत्रांमध्ये तोटा होत आहे. यूएस मध्यवर्ती बँक फेड रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केल्याने आणि आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसल्यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. या कारणास्तव, तीन प्रमुख स्टॉक एक्सचेंजमध्ये विक्रीचे वर्चस्व दिसून येत आहे. S&P 500 मागील सत्रात 132.1 (3.20%) वर बंद झाला. त्याचप्रमाणे डाऊ जोन्स 653.67 अंक (1.99%) आणि नॅस्डॅक कंपोझिट 521.41 अंकांनी (4.29%) बंद झाले. Explainer | रुपया कमकुवत किंवा मजबूत झाला तर काय होतं? सर्वसामान्यांवर कसा होतो परिणाम युरोपीय बाजारही घसरले अमेरिकन शेअर बाजारातील भूकंपाचा परिणाम युरोपवरही चांगलाच दिसून आला. रशिया-युक्रेन संकटापुढे आधीच झुंजणाऱ्या युरोपातील सर्व प्रमुख शेअर बाजार या धक्क्याने हादरले. जर्मनीचे शेअर बाजार 2.15 टक्क्यांनी घसरून बंद झाले, तर फ्रान्सचे शेअर बाजार 2.75 टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे, लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये मागील सत्रात 2.32 टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. आशियाई बाजारही कोसळला आज सकाळी उघडलेले आशियातील बहुतांश शेअर बाजार लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. सिंगापूरचा स्टॉक एक्स्चेंज 0.98 टक्के आणि जपानचा निक्केई 1.89 टक्क्यांच्या तोट्याने व्यवहार करत आहे. हाँगकाँगचा बाजार 3.92 आणि तैवानचा शेअर बाजार 1.29 टक्क्यांच्या तोट्यात राहिला आहे. त्याचप्रमाणे, दक्षिण कोरियाच्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये 1.66 टक्के आणि चीनच्या शांघाय कंपोझिटमध्ये 1.44 टक्के तोटा आहे. आर्थिक संकटात न अडकता चिंतामुक्त जीवन जगा! पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटसाठी फॉलो करा ‘या’ पाच टिप्स विदेशी गुंतवणूकदारांची बंपर विक्री विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजाराबाबत भ्रमनिरास झाला आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FIIs) निधी काढण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रातही FII ने 3,361.80 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. या कालावधीत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 3077.24 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, परंतु बाजारातील घसरण टाळता आली नाही.