JOIN US
मराठी बातम्या / मनी / Stock Market updates: शेअर बाजार उघडताच आपटला, सेन्सेक्समध्ये 800 अंकांची घसरण

Stock Market updates: शेअर बाजार उघडताच आपटला, सेन्सेक्समध्ये 800 अंकांची घसरण

जागतिक स्तरावरील खराब संकेतांमुळे आज शेअर बाजारात (Stock Market Latest Update) कमजोर सुरुवात झाली आहे. बीएसई इंडेक्स सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) 9 वाजून 40 मिनिटांनी 800 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 जानेवारी: जागतिक स्तरावरील खराब संकेतांमुळे आज शेअर बाजारात (Stock Market Latest Update) कमजोर सुरुवात झाली आहे.  बीएसई इंडेक्स सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) 9 वाजून 40 मिनिटांनी  800 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. तर निफ्टी (Nifty) 238.40 अंक अर्थात 1.21 टक्क्यांनी घसरुन 17,695.95 व्यवहार करत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 638.93 अंकांनी अर्थात 1.06 टक्क्यांनी घसरुन 59,584.22 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 182.30 अंक अर्थात 1.02 टक्क्यांच्या कमजोरीसह 17,742.95 वर उघडला होता. तेजीसह बंद झाला होता बाजार बुधवारी शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60,000 चा माइलस्टोन पार केला होता. सेन्सेक्समध्ये 367.22 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती, त्यानंतर सेन्सेक्स 60,223.15 वर बंद झाला होता. तर निफ्टीमध्ये 120 अंकांची वाढ होऊन 17,925.25 वर बंद झाला होता. बातमी अपडेट होत आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या